…गस्टोळी -इटगी हायस्कूलचे राजकारण विकोपाला; विनाकारण राजकारण होत असल्याचा आ. हलगेकर यांचा आरोप...
खानापूर : लोकहित न्यूज
गस्टोळी आणि इटगी खानापूर तालुक्यातील दोन्हीं गावच्या मध्ये हायस्कूलचे राजकारण विकोपाला गेले असून, परवा इटगी येथील हायस्कूल गस्टोळी गावात हलविल्याने इटगीच्या विद्यार्थी व नागरिकांनी आंदोलन छेडले होते. त्यावेळीं कर्नाटक रक्षण वेदिकेच्या एका पदाधिकाऱ्याने माझ्यावर आरोप करत माझ्या घराला कुलूप लावू अशी वल्गना केली आहे. या विषयावरून होत असलेले हे फुकटचे राजकारण सुरू आहे, त्याचवेळी सदर करवे च्या पदाधिकाऱ्याने माझ्या घराला कुलूप लावू असे बोलून दाखवले, त्यांनी हिंमत असेल तर माझ्या घराला कुलूप लावून दाखवावे असे मत थेट आव्हान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी करवे’च्या पदाधिकाऱ्याला दिले आहे. त्याच बरोबर या हायस्कूलबाबत राजकारण होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे .
या हायस्कूलच्या विरोधात विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी आंदोलन छेडले होते, त्यात माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांनी त्याला समर्थन दिले आहे. दोन्हीं ठिकाणीही हायस्कूल हवे आहे त्यात कोणतेही गैर नाही. पण, त्यावरून होणारे राजकारण निंदनीय असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. मात्र, याठिकाणी उपस्थीत असलेल्या करवे च्या एका पदाधिकाऱ्याने माझ्यावर आरोप करत नेपाळसारखी परिस्तिथी करत माझ्या घराला कुलूप लावू असे बोलून दाखवले. त्यांनी ते करून दाखवावे असे आव्हान देतानाच इटगी येथे सद्या एक खासगी हायस्कूल व कॉलेज ची व्यवस्था आहे. तरीही सरकारी हायस्कूलची गरज आहे. त्याबाबत माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गस्टोळीत नवीन शाळा मंजूर करण्याची हमी दिली आहे, त्याचे मी स्वागत करतो असेही त्यांनी सांगितले.
..व्हाट्सअप ग्रूपवरून टीका टीपणीबाबत पोलिसांची कारवाई लगेच; मात्र ,माणिकवाडीतील खुनातील आरोपी मोकाटच, काय? करतात पोलिस ….
व्हाट्सअप ग्रूपवरून टीका टि्पणी केल्याच्या आरोपावरून जांबोटीचे दुर्गाप्पा तलवार आणि लोकोळीचे संतोष पाटील यांच्यावर लगेच झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा आ. विठ्ठल हलगेकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला बोलायला हक्क आहे, तरीही त्या दोघांना लगेच पोलिसांकडून मध्यरात्री घरातून उचलून अनन्यात आले, ही चुकीची पद्धत तालुक्यात सुरू झाली असल्याचे सांगतानाच, दुसरीकडे माणिकवाडी खून प्रकरणातील आरोपी मात्र, मोकाटच आहे, या प्रकरणात पोलिस इतकी तत्परता का?दाखवत नाहीत, पोलिसांच्या या दुतप्पी धोरणाचा मी निषेध करतो असेही आ. हलगेकर यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानीकोप, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, सचिव मल्लापा मारीहाळ, युवा नेते पंडित ओगले, प्रशांत लक्केबैलकर, भरमानी पाटील, राजू सिध्दानी यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते…







Leave a Reply