मागच्या आठवड्यात जांबोटी -कुंभार्डा येथे आरोग्य केंद्राचे भूमिपूजन पार पडले; या दोन्हीं ठिकाणी दोन- दोन आरोग्य केंद्राची होणार उभारणी!
खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुका निरोगी ठेवण्याचा जणू चंगच बांगलेला दिसतोय! याच महिन्यात जांबोटी मोदेकोप, कुंभार्डा या तिन्हीं ठिकाणी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते आरोग्य केंद्रांचे भूमिपूजन करण्यात आले आहे, त्या कामांना लवकरच सुरवात होणार असतानाच, कुंभार्डा आणि जांबोटीत या दोन्हीं ठिकाणी आणखी एक -एक आरोग्य केंद्र उभारण्यास आरोग्यमंत्री यू. टी. खादर यांनी मंजुरी दिली आहे. तसे पत्र आमदार विठ्ठल हलगेकर यांना आले असून, त्यामध्ये लवकरात लवकर आरोग्य केंद्र उभारण्याबाबतच्या हलचाली करा असा आदेश देण्यात आला आहे. याआधीचे आणि आताचे नवीन आरोग्य उभारण्यास या दोन्हीं ठिकाणची आरोग्य समस्या कायमचीच दूर होणार आहे.
पण, जागेची निवड करणे आवश्यक…
आता नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांसाठी दोन्हीं ठिकाणी जागेची वानवा असून आधी जागेची निवड करून नंतरच ही आरोग्य इमारत उभारण्याबाबतच्या हलचाली करण्याची गरज आहे.
जुलैमध्ये आमदारांनी आरोग्य मंत्र्यांना पत्र दिले होते!
विधानसौधमध्ये भेटीदरम्यान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आरोग्य मंत्री यू .टी. खादर यांना जांबोटी आणि कुंभार्डा या ठिकाणी आरोग्य केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. 9/ 7 / 2026 तारखेला सदर पत्र दिले होते. त्याची दखल आरोग्य मंत्री यू.टी. खादर यांनी घेतली असून, तात्काळ सदर मागणी पूर्ण करण्याची हमी देत तसा लेखी आदेश आरोग्य विभागाला बजावला आहे.
