जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महेश साबळे यांना रोटरीचा ‘नेशन बिल्डर आवर्ड ‘…


भागातून कौतुकाचा वर्षाव; महिला विद्यालयामध्ये बागलकोटचे उपकुलगुरू डॉ. आनंद देशपांडे यांच्याहस्ते गौरव..

जांबोटी : लोकहित न्यूज

     विश्वभारत सेवा समितीच्या जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे गणित शिक्षक महेश हणमंतराव साबळे यांना रोटरी क्लबच्यावतीने देण्यात येणारा नेशन बिल्डर अवार्ड (पुरस्कार) प्रदान करण्यात आला. बागळकोटचे उपकुलगुरू डॉ. आनंद देशपांडे , रोटेरियन रेणू देशपांडे, रोटेरीयन आनंद नाडगौडा यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 18 वर्षातील शैक्षणीक क्षेत्रात काम करत असताना शैक्षणीक तंत्रज्ञान आणि विद्यालय विकास उत्तम करण्यास त्यांनी मोठें परिश्रम घेतले आहेत, त्यामुळेच ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा कविता कणगणी, सचिव शिल्पा खडकभावी यांनीही उपस्थीत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *