नागरिक म्हणतात – जांबोटी -खानापूर परिसरातील अलीकडच्या सोसायटी अध्यक्षांची ‘आधीची’ आणि ‘सध्याची’ आर्थिक परिस्थिती ‘चेक’ केली तर?… यावरच पुढच्या भागात ‘आढावा’ घेतला जाईल…. लवकरच…

0

बहुतेक ठिकाणी सोसायटी विकास कमी, संचालक -अध्यक्षांचा विकास अधिक दिसून येतो; यामध्ये प्लॉट खरेदी, काहीं…


Screenshot_20260807_224003

बहुतेक ठिकाणी सोसायटी विकास कमी, संचालक -अध्यक्षांचा विकास अधिक दिसून येतो; यामध्ये प्लॉट खरेदी, काहीं ठिकाणी सोसायटी जागेची अदलाबदल ‘चर्चेचा’ विषय....

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

    खानापूर असो किंवा जांबोटी भागातील सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत अर्थात कमी होण्यास नुसतीच कर्जदारांकडून थांबलेली कर्ज वसुली तेवढीच कारणीभूत नसून, अध्यक्ष आणि संचालकांची मनमानीही कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे, कारण जांबोटीसह -खानापुरातही काहीं ठिकाणीं सोसायटी अध्यक्ष आणि संचालक झाल्यानंतर पैशांनी गडगंज झाल्याचे दिसून येते, यावरच लोकहितचा न्यूजचा पुढचा भाग असेल…

     यामध्ये विशेष असे दिसून येते की, प्लॉट खरेदी करणे, जांबोटीसह काहीं ठिकाणी आधी सोसायटीच्या नावावर असलेली जागा अदलाबदल झाल्याचे प्रकारही दिसून येतात… यामध्ये इतर संचालकांचाही सहभाग आहे की, त्या सोसायटीतील प्रभावी संचालक -अध्यक्षांनी मनमानी करून सोसायटी जागेची अदलाबदल करण्यास भाग पाडले असेल का??? कोणी कुठे? कधी आणि कसे जागा, प्लॉट घेतलेत यावर पुराव्यानिशी वाचकांसमोर प्रसिद्ध करू…. तूर्तास वाचकांकडून मिळणाऱ्या भारघोस प्रतिसादाबद्दल लोकहित न्यूज तर्फे जाहीर आभार…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed