खानापूर ‘शतकोत्तर’ बँकेची आर्थिक स्थिती मजबूतच: चेअरमन अमृत शेलार


2024- 25 सालात 13 लाख 63 हजार रूपये नफा, 85 कोटींच्या ठेवी , पहिल्याच वर्षी बिडी ,काकतीवेश येथील शाखा नफ्यात तर पारिश्र्वाडची स्थिती समाधानकारक…

खानापूर: लोकहित न्यूज

     खानापूर तालुक्यातच जुनी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर को – ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती मजबूतच असून, 2024-25 सालात 13 लाख 63 हजारचा निव्वळ नफा झाला आहे, 85 कोटींच्या ठेवी असून, 63 कोटींची कर्जे वाटप करण्यात आली असल्याचे सांगतानाच, एका वर्षातच बेळगांव काकतीवेश, बिडी येथील शाखांही नफ्यात आल्या असून,पारिश्र्वाड शाखेचीही आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अमृत शेलार यांनी दिली. बँकेला शतक पूर्ण झाल्यानंतरच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी त्यांनी अहवालाचेही वाचन केले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी बोलतांना, सहकार क्षेत्र हे शेतकऱ्यांचे आधारवड आहे. कोणतेही वाद- विवाद असतील तर ते सामोपचाराने मिटविणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सांगत ही सभा संपली असे त्यांनी जाहीर केले.

   ..सभासद दिनकर मरगाळे यांच्याकडून शंका उपस्थीत..

       बँकेचे सभासद असलेले दिनकर मरगाळे  यांनी मला अहवाल का? मिळाला नाही असा प्रश्न करत बँकेत कामगार भरती प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त केली. बँकेत तालुक्यातील मुलांना भरती न करुन घेता, बाहेरील लोकांना घेण्यात आले आहे , त्यामुळे यात कोणता अर्थीक व्यवहार झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित करतांनाच, त्याबद्दलची माहिती देण्याची मागणी केली. याबाबत लोकहित न्यूज ने चेअरमन अमृत शेलार यांच्याशी विचार केला असता, असे काहीही नसून, कायदेशीर भरती प्रक्रिया केली असून, तालुक्यांतीललच मुलांना कामावर घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. तर संचालक बाळासाहेब शेलार यांनी मी 19 वेळा अनेक विषयांची माहिती मागितली होती, त्याला बँकेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलतांना सांगितले.

   यावेळी सरव्यवस्थापक विजय साळुंखे यांनी स्वागत केले. नंदगड शाखेचे व्यवस्थापक विश्वास देसाई यांनी ताळेबंदचे वाचन केले तर मुख्य शाखेचे व्यवस्थापक रामकृष्ण देसाई अंदाज पत्रकाचे , कृष्णा गुरव यांनी नफा तोट्याचे वाचन केले. बँकेचे सीएराज बोळवण यांनी बँकेचा आर्थिक आढावा सादर केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मेघश्याम घाडी, संचालक परशराम गुरव, डॉ. चंद्रकांत पाटील, रमेश नार्वेकर, विजय गुरव, अंजली कोडोळी, अंजुबाई गुरव, मारूती पाटील, मारूती बीलावर, अरुण बुरुड, दीपक चव्हाण, प्रकाश बाळेकुंद्री, रवी काडगी, डी.एम.भोसले प्रकाश देशपांडे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *