जांबोटीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौडने दणावून गेला परीसर... छोट्या मुला-मुलींची उपस्थिती लक्षणीय..
जांबोटी : लोकहित न्यूज
दरवर्षी दसऱ्यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे काढण्यात येत असलेल्या दुर्गामाता दौडमुळे आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळाली असून, धार्मिकबरोबर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर पराक्रमाची जागृती होत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे मत, जांबोटी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जांबोटी दौडचे अध्यक्ष सचिन कुडतूरकर यांनी मांडले. त्यांच्या व उपाध्यक्ष मारुती हळब यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सुरवातीला बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पुजा करून, घोषणाबाजीने दौडला सुरवात करण्यात आली. प्रभाकर बिर्जे यांच्याहस्ते ध्वज चढवून पूजन करण्यात आले. शस्त्र पूजन राजू पवार, राजू गावडे, संतोष घेवारी यांच्याहस्ते करण्यात आले.
आज सोमवार (दि.22) शिवस्मारक चौकात पूजा करून दुर्गादेवी मंदीर, गांधीनगर, पारवडकर गल्ली, भट गल्ली , राममंदिर दर्शन झाल्यानंतर पांचाची खुट्टी येथे अल्पोहारानंतर दौडची सांगता करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष मनोहर गोवेकर,सचिव राजू कुर्लेकर, प्रसाद कुडतुरकर , विजय कणगुटकर, मदन करुणाकर, मिथुन कुंभार, दत्ता पारवडकर, आनंद सुत्तार, संतोष घेवारी, प्रज्योत हळदणकर, मयूर किनारी, विनोद पारवावडकर, प्रवीण जांबोटकर, मयूर किनारी, रवी गुरव, ओमकार बिर्जे यांच्यासह दौडचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दौलत कोलीकर यांनी अल्पोहाराची व्यवस्था केली होती. यावेळी पोलीस उप सहाय्यक निरिक्षक बाहुबली, सहायक पोलिस कुलकर्णी यांनीही यावेळी उपस्थित होते.







Leave a Reply