कुसमळी पुल, अनमोड मार्गाची संपूर्ण वाहतूक वळविल्याने खानापूर रस्त्याला धोका.. या रस्त्याला कोणी वाली आहे का?

जांबोटी: लोकहित न्यूज
खानापूर- जांबोटी रस्त्यावरून अवजला कोणी परवानगी दिली…
जांबोटी पश्चिम भागासाठी नादुरुस्त रस्त्यांचे ग्रहण सुटणे कठीण झालेले असताना, आता खानापूर – जांबोटी रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे कुसमळी पुलमुळे दोन महिन्यापासून चोर्ला मार्ग बंद आहे, गेल्या चार दिवसांपासून खानापूर अनमोड मार्गही बंद पडल्याने संपूर्ण वाहुकीचा भार जांबोटी -खानापूर रस्त्यावर पडला आहे. परिणामी धोकादायक अवजड वाहतूकही या रस्त्याने सुरू असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी राजवाडा जांबोटी रोडजवळ अवजड वाहतुकीचा एक ट्रक रस्त्यावर बाजुला सरकून आडवा झाल्याने सकाळीं सकाळच्या सत्रात तब्बल सहा तास हा रस्ता ब्लॉक झाला होता. त्यामुळे जांबोटीकडे येणारी बस वाहतूक बंद होती. त्यामुळें शाळकरी मुलांची मोठी गैरसोय झाली होती.
खानापूर – जांबोटी रस्त्याने अवजड ला कोणी परवानगी दिली?
आधीच रस्त्याची दुरवस्था झालेली असताना त्यात पंचवीस टणाहून अधिक ओझ्याच्या ट्रकना कोणी परवानगी दिली असा संतप्त सवाल भागातील नागरिकातून विचारण्यात येत आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष शंकर सडेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना केला आहे. बांधकाम खाते आणि पोलिस काय करताहेत की, बघ्याची भूमिका घेत आहे, या दोन्हीं खात्यांच्या कारभाराबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply