भैरु पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन…
जांबोटी: लोकहित न्यूज
बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या कौलापूरवाडा (ता. खानापूर) येथे होवू घातलेला क्वालिटी पोल्ट्री कंपनीचा हॅचरी प्रकल्प तत्काळ बंद करण्याच्या आदेश द्या अशी मागणी कौलापूरवाडा गावकऱ्यांनी महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात, सदर प्रकल्प गावकऱ्यांच्या जीवावर बेतनारा आहे, तरीही स्थानीक अधिकाऱ्यांच्या मदतीने गावकऱ्यांवर जबदास्तीने रेटण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्या नागरिकांना काही स्थानीक अधिकारी झुलवत आहेत. जिल्हा आरोग्य खाते, प्रदूषण मंडळ यांची परवानगी शिवाय ग्राम पंचायत ठराव न घेताच बेकायदेशररित्या हा प्रकल्प का? आमच्यावर लाधला जात आहे. याची पहिल्यांदा चौकशी करा आणि त्वरीत सदर प्रकल्प बंद करण्याचा आदेश डीसीना द्या असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मंत्र्यानी सदर निवेदन पाहून विचार करण्याची हमी दिली. यावेळी तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी, सुरेश जाधव, बाबू बावदाने, गंगाराम बावदाने यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
Leave a Reply