अखेर मा.आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी पोलिस ठाण्यात जावून ‘त्या’ दोघांची केली सुटका..


पांचांतर्फे डॉ. निंबाळकर यांची भेट घेत’ माफीनामा ‘

   

    खानापूर : लोकहित न्यूज

         माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी कालपासून पोलिस ठाण्यात अडकून पडलेल्या त्या दोघांची अखेर माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांची  माफी मागितल्यानंतर त्यांची रविवारी सुटका करण्यात आली.

    अपशब्दची बातमी तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली होती, त्यानंतर लागलीच लोकोळीच्या पंच कमिटी आणि संतोष यांच्या वडील आणि भाऊनी माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या विषयावर बराच वेळ चर्चा झाली, मुळचे निंबाळकर यांचेच जुने कार्यकर्ते असलेल्या दुर्गेश तलवार आणि संतोष पाटील यांनी हे चुकीचे वर्तन केले असून, त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो अशी विनंती डॉ. निंबाळकर यांच्याकडे केली. त्यानंतर लगेच डॉ.निंबाळकर यांनी थेट पोलिस ठाण्यात जावून त्यांची सुटका करण्याची पोलिसांना सूचना केली. त्यावेळी पोलिस ठाण्यात असलेल्या त्या दोघांनी डॉ अंजली निंबाळकर यांच्याकडे चूक झाल्याचे कबूल करत यापुढे अशी चूक होणार नसल्याची मान्य केले. एक माजी आमदारांची तीही अखिल भारतीय काँग्रेसच्या असणाऱ्या सचिव डॉ अंजली निंबाळकर यांच्याबाबत अपशब्द वापरणे म्हणजे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रीया सर्वत्र उमटत आहेत..

प्रतक्रिया –

    ते दोघेही एकेकाळचे आमचेच कार्यकर्ते होते, त्यांनी केलेले कृत्य निंदनीय आहे. या दोघांनीही विचार करुन वागणे गरजेचे आहे. मी पोलिस ठाण्यात जावून त्यांची सुटका करण्याची सूचना पोलिसांना केली. त्यानंतर त्यांची सुटका झाली.

  • डॉ. अंजली निंबाळकर, मा आ. तथा अखिल भारतीय काँग्रेस सचिव.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *