पानिपतकार विश्वासराव पाटील 99 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष!


1 ते 4 जानेवारी या कालावधीत होणार साहित्य संमेलन..

पुणे :  लोकहित न्यूज नेटवर्क

    सातारा येथे 1 ते 4 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या 99 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पानिपतकार विश्वासराव पाटील यांची रविवारी ( ता.14) पार पडलेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या  बैठकीत निवड करण्यात आल्याची माहिती, मंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. घटक, समाविष्ट आणि सलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचवले होते. यावेळचे नियोजन शाहूपुरी मंडळाने करायचे आहे, म्हणूनच पुणे मंडळाने कोणाचेही नावं सुचवले नाही. त्यामुळे एकमताने ही निवड झाली आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *