राधाकृष्णन यांना 452 तर सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली..
नवीदिल्ली: लोकहित न्यूज नेटवर्क
आज 17 व्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या चुरशीच्या मतदानात अखेर एनडीएचे उमेदवार सी. पी.राधाकृष्णन यांनी बाजी मारली असून, इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्यावर 112 मतांनी विजय मिळवला आहे. राधाकृष्णन यांना 452 मते पडली तर रेड्डी यांना 300 मते मिळाली. सुरवातीला सुदर्शन रेड्डी यांना चांगली मते पडतील अशी अपेक्षा होती, त्यामुळेच एनडीएने सावध भूमिका घेतली होती. सुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले तर त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मतदान केले. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मतदान पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे.
…असे झाले राजकीय गणित…
दरम्यान भारत राष्ट्र समितीचे 4 खासदार , बिजू जनता दलचे 7 खासदार , शिरोमणी अकाली दलाचे 1लोकसभा तर 2 राज्यसभा खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. एलेक्टरल कॉलेजमध्ये एकूण 788 सदस्य आहेत, त्यामध्ये 246 राज्यसभा तर 543 लोकसभेचे सदस्य आहेत. पण, सद्या या सदस्यांची प्रत्यक्षात 781संख्या आहे, कारण, त्यातील 6 राज्यसभेत तर 1 जागा लोकसभेत रिक्त आहे. त्यामुळे विजयासाठी 391 मते अपेक्षित असतात.






Leave a Reply