ग्रामीण भागात काहीं भीतीदायक पद्धतींना वाव; तर शहरात याला फाटा, मानवी जीवनात चंद्र ग्रहण महत्वाचेच ….
पुणे: लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)
रविवारी (ता.7)रात्री 10 च्या सुमारास सुरू होवून मध्यरात्री दोनच्या दरम्यान संपलेले चंद्रग्रहण शुभच होते असे पुणे (पीओजीएस) खगोल अभ्यासक सोसायटीने स्पष्ट केले आहे. चंद्र ग्रहण हे खगोल ‘शास्त्रज्ञ ‘ यांच्यासाठी जणू ती एक पर्वणीच असते! याकाळात ग्रामीण भागात प्रचलीत असलेली पद्धत गैरसमजूत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारच्या रात्रीचे ग्रहण हे चालू वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण होते. नव्या -उमद्या खगोल अभ्यासकांसाठी हा एक महत्वाचा टप्पा होता.
चंद्र ग्रहणाचा गर्भवतींवर कोणताच परिणाम नाही: पुणे खगोल शास्त्रज्ञ डॉ. मनीष माचवें यांचे मत…
विशेष म्हणजे ग्रहणाच्या काळात गर्भतींना यामुळें त्रास होतो अशी गैरसमजूत असून, ती चुकीची आहे. चंद्र ग्रहणामुळे गर्भवतींना कोणताही धोका नसतो तर तो एक वैद्यकीय दोष असू शकतो. त्यामध्ये आनुवंशिक, चयापचविषयक, संसर्ग, किरणोत्सव, काहीं औषधे, रसायने यामुळे त्रास जाणवू शकतो! ग्रहणामुळे गर्भवतींच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होतो असा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही! त्यामुळे गर्भवती आणि चंद्र ग्रहण यांच्यात गैसमजुत करुन घेणे योग्य नाही असे पुणे खगोल अभ्यासक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मनीष माचवे व सरचिटणीस डॉ.शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केले आहे. हिंदू धर्मात चंद्र ग्रहणाच्या काळात गर्भवतींना बंधने घातली जातात तो एक अंधश्रध्देच्या भाग असू शकतो, त्याला वैद्यकीय असा कोणताही आधार अथवा कोणताही पुरावा नाही असेही डॉ. माचवे आणि डॉ. बलकवडे यांनी पुढे बोलतांना सांगितले. याकाळात गर्भवातींना आराम द्यावा , अशा बंधनापासून त्यांना दूर ठेवावे असेही आवाहन, खगोल अभ्यासकांकडून केले जात आहे. खगोल शास्त्रीय आणि धार्मिक दृष्टीकोनातून चंद्र ग्रहणाचे विशेष महत्व आहे. तर ज्योतिषीशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम देश आणि जणांवर दिसून येतो तर त्यानूसार हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. याला वैद्यकीय असा कोणताही आधार वैधकिय पुरावा उपलब्ध नसून, ग्रहण हे मानवी जीवनातील महत्वाचा पैलू मानला जातो..
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी अनुभवले ‘ खग्रास चंद्र ग्रहण ‘
रविवारचे ग्रहण दोन वर्षांनंतर होणारे चालू वर्षातील शेवटचे ग्रहण असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनीही याचा अनुभव घेतला. बेळगांव शहरात साडेअकराच्या दरम्यान अर्ध्याहून अधिक पृथ्वीचे व्यापलेला ‘चंद्र ‘ अर्ध्या तासानंतर म्हणजेच 12 वाजता पूणपणे पृथ्वीचे व्यापलेला लालबुंद झाला होता. अगदी ठरलेल्या वेळेत म्हणजे दोनच्या सुमारास हे ग्रहण सुटले…






Leave a Reply