चालू वर्षातील पहिले आणि शेवटचे असेल हे खग्रास चंद्रग्रहण : दोन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण भारतात दिसणारे पहिले महत्वपूर्ण ग्रहण..
नवीदिल्ली: लोकहित न्यूज (विशेष प्रतिनिधी)
गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला आणि पितृपक्ष सुरवातीला संपूर्ण ब्रम्हांडात आजच्या शुभ रात्री चालू वर्षातील पहिले महत्वपूर्ण चंद्र ग्रहण 9 वाजून 59 मिनिटांनी सुरू सुरू झाले असून, साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर अर्धा चंद्र पृथ्वीच्या छायेत गेला होता! आज दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी 9 तास आधी लागणारे सुतक काळ सुरू झाला होता . हे ग्रहण कुंभ राशीत आणि शततारका नक्षत्रात सुरू झाली. रात्री 11पाच मिनिटांच्या दरम्यान ढगांनी आकाश व्यापल्याने जांबोटी परिसरात बराच वेळ ग्रहण दिसू शकले नाही!…खग्रास चंद्रग्रहण कशे असते?
…खग्रास चंद्रग्रहण कशे असते?
जेंव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते तेंव्हाच खग्रास चंद्रग्रहण होते. यावेळी चंद्र पृथ्वीच्या पूर्णपणे छायेत गेल्यामुळे काळा न दिसता तांबूस रंगाचा दिसू लागतो, म्हणून त्याला खगोल शास्त्रज्ञ यांच्या मते ब्लड मून असे म्हणतात . सूर्य प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जात असल्याने त्याचा प्रकाश चंद्रावर पडल्याने त्याचा रंग लाल दिसतो!






Leave a Reply