…चिखले सातेरी केळबाय श्री रामप्रभू मंदिरात 40 हजाराची चोरी….


गावकऱ्यांची पोलिसात तक्रार; जांबोटी पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी…

चिखले: लोकहित न्यूज…

     चिखले (ता. खानापूर) येथील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सातेरी केळबाय श्री रामप्रभू मंदिराचे दरवाजे तोडून दानपेटी फोडून त्यातील 40 हजाराची रक्कम चोरट्यांनी  लांबवल्याची माहिती नागरिकांनी दिली. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून ,शुक्रवारी सकाळी  ती उघडकीस येताच नागरिकांकडून पोलिसांना प्राचारण करण्यात आले. लागलीच जांबोटी आऊटपोस्टचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी  घटनास्थळाची पाहणी केली. शहराबरोबर ग्रामीण भागातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा शोध घेवून जेरबंद करावे ,तसेच चिखले मंदिरातील चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी पारवाड ग्राम पंचायतीचे माजी सदस्य अप्पांना गावडे यांनी गावकऱ्यांच्यावतीने केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *