सहकार मंत्र्यांकडे तक्रार: तत्काळ चौकशीची मागणी..
खानापूर : लोकहित न्यूज
तालुक्याची सहकारी सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदगड मार्केटिंग मध्ये दोन कोटींहून अधिक गैव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषद चन्नराज हट्टीहोळी यांनी खानापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. गेल्या तीन वर्षाच्या ऑडिटमध्ये कोणताही ताळमेळ नाहीं. कोणतेही कारण नसतांना डीसीसी बँकेकडून कोटींच्या घरात अँडव्हान्स पैसे घेण्यात आले असून, यामध्ये काहीं संघांच्या ठेवी असून, काहींचे आर्थिक साठेलोटे आहेत असा आरोप करत, याची चौकशी व्हावी अशी मागणी करत, राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी खानापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री .हट्टीहोळी पुढे बोलतांना म्हणाले की, गेल्या तीन वर्षात मार्केटिंग च्या ऑडिटमध्ये कोणताही ताळमेळ नसून , कोणत्या विषयासाठी कोणत्या योजनेसाठी घेतलेले कर्ज , ऍडव्हान्स निधी खर्च करण्यात आला त्याचे कोणतेही कारण नाही. जवळपास दोन कोटीच्या वर ॲडव्हान्स कर्ज घेण्यात आले असून, ते कोणत्या कारणासाठी खर्च केले गेले याचा लेखाजोखा नाही, हे सर्व लेखापरीक्षक अहवाला दिसून येत आहे, याबाबत आम्हीं आवाज उठवणार असून, तशी लेखी तक्रार सहकार मंत्र्याकडे करण्यात येईल. रेशन पुरवठा , गॅस एजन्सी तसेच मंगल कार्यालय सुधारण्यासाठी कोटींचे कर्ज घेण्यात आले असतानाही मार्केटिंग तोट्यात कशी? असा सवाल करत शेतकऱ्यांना आधारस्तंभ ठरलेली ही सोसायटी बंद पडते की काय? अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. दोन लाखाची मर्यादा असताना अध्यक्ष सदस्यांनी कोटींची आगाऊ रक्कम उचलल्याचेही लेखा परीक्षण अहवालातून समोर आले आहे. या सर्व सर्व प्रकारांमध्ये कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रतिक्रिया –
70 वर्षा पूर्वीची आमची सोसायटी शेतकऱ्यांचा आधार आहे, जे आरोप होत आहेत ते सद्या सुरू असलेल्या डीसीसीच्या राजकारणातून आहेत. आमच्याकडे कोणताही गैरव्यवहार झालेला नसून, आम्हीं कोणत्याही चौकशीस सामोरे जायला तयार आहोत. उगाचच वैयक्तिक राजकारण शेतकऱ्यांच्या मार्केटिंगमध्ये आणू नये! सर्वकाही सुरळीत असतानाही या आरोपात कोणतेही तथ्य नाही…

–ज्ञानेश्वर नीलजकर, मॅनेजर नंदगड मार्केटींग..
खानापूर






Leave a Reply