सामाजिक कार्यकर्ते व्यंकट पाटील यांच्याकडून तोराळी गावात कीटकनाशक औषधाची फवारणी; इतरांनीही आदर्श घेण्याची गरज…
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (प्रतिनिधी)
नेहमीच सामाजिक कार्यासाठी धडपडत राहणाऱ्या गोल्याळी (ता.खानापूर) ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सारिका पाटील यांचे पती व्यंकट शंकर पाटील यांनी स्वतः तोराळी गावात डासांसह विविध विषारी कीटकांचा नायनाट करणाऱ्या कीटकनाशक औषधाची फवारणी करून समाजात वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. आधीच यंदा जांबोटी भागातील बहुतेक पंचायत क्षेत्रात गटारी, झाडी स्वच्छता झालेली नसून, त्यातून निर्माण होणाऱ्या डासांसारख्या कीटनाशकांची औषध फवारणीही काही ठिकाणी होवू शकली नाही. अश्या परिस्थितीत व्यंकट पाटील हे याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी या समस्येचं गांभीर्य ओळखून स्वता औषध फवारणीचा पंप घेतला हातात अन् सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. त्यामुळे याचा इतर ग्राम पंचायतीच्या सदस्य, अधिकाऱ्यांनी आदर्श घेण्याची गरज आहे. नाही तर उगाच नावापुरते सदस्य म्हणवून घेण्यात काहीच अर्थ नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत. व्यंकट पाटील यांनी ग्राम पंचायत, ता. पं. कडे अथक प्रयत्न आणि पाठपुरावा करून गावात नैसर्गिक झऱ्याचे पाणी तोराळी गावात आणले आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगताना दिसत आहे.
… कीटकनाशकांच्या फवारणीसाठी हाती घेतला पंप….
गावात कीटकनाशकांचा फैलाव होवू नये म्हणून, व्यंकट पाटील यांनी स्वतः औषधाचा पंप हाती घेवून फवारणी केली. वास्तविक हे काम ग्राम पंचायतीचे आहे, ते जरी तोराळी ग्राम पंचायत सदस्यांचे पती असले तरी अशी गावच्या हिताची कामे करणाऱ्यांची संख्या तशी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच सापडेल! असे सामाजिक कार्य प्रत्येकाच्या हातून झाले पाहिजे. विशेष करुन भागातील इतर ग्राम पंचायतीने याची दखल घेवून आपापल्या क्षेत्रात अशी खाबरदारी घेण्याची गरज आहे…
..पाण्याच्या योजनेसाठी 13 लाखाचा निधी खर्च झाला…
गावच्या लगतच्या जंगलातील पाणी गावात आणण्यासाठी तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतीतून मिळून 13 लाखाचा निधी व्यंकट पाटील यांनी मंजूर करून घेतला. गेल्या काही काळापासून ते याबाबत अथक प्रयत्न करत आहेत. अखेर त्यांनी तोराळी गावात पाणी आणून उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई दूर केली आहे. याबद्दल गावकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. दूरवरून पाइपलाइनद्वारे हे पाणी गावात आणण्यात आले आहे.
..नागरीकांचे म्हणणे काय?
व्यंकट पाटील हे सतत समाजासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी कायम धडपडत असतात, त्यातूनच त्यांनी स्वतः पंप हाती घेवून किटकनाशक औषध फवारणीचे काम करून एक वेगळा अनुभव दिला आहे. शिवाय त्यांनी गावात नविन योजनेद्वारे गावात पाणी आणल्याने उन्हाळ्यात गावाला मोठा दिलासा मिळेल..
–महेश पाटील, युवा कार्यकर्ता तोराळी…







Leave a Reply