खानापूरचा उगवता तारा; वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव …
खानापूर : लोकहित न्यूज
समाजासाठी हितासाठी थोडे तरी योगदान देणे हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील उद्दिष्ट आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याच मार्गाने चालत आलेल्या जेडीएसचे युवा नेते अलीम अख्तर नाईक यांनी खऱ्या अर्थाने समाजासाठी सामजिक कार्य साधले आहे. त्यांच्या आजच्या वाढदिनी जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या दहा वर्षात अलीम नाईक यांनी समाजसेवेचे जणू व्रत केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! लोकहित न्यूज तर्फे अलीम नाईक यांना ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ‘…
….कोरोनाच्या काळात मदतीचा ओघ…
2019 ते 20-21 च्या काळात सर्वत्र कोरोनाची लाट पसरली असताना अलीम नाईक यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी सर्वकाही सेवा दिल्या. ऑक्सीजन , शानीतैजर असो वा लागणारी औषधे सामुग्री हजारो रुग्णांना पुरविली आहेत. अशी समाजाप्रती तळमळ असलेल्या नाईक यांना मानाचा मुजरा करण्यात येत आहे. अशावेळी त्यांनी भाषा, धर्माचा कधीही पक्षपातीपणा केला नाहीं.
…नागरी समस्या सोडवण्यासाठी मंत्र्यांच्या दारी…
खानापूर तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी धडपडणाऱ्या अलीम नाईक यांचे एक पाऊल पुढेच आहे. रस्ते, पाणी, वीज, शैक्षणीक बाबतीत मंत्र्यांच्या कार्यालय, घराचे उंभरे झीजवून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कायम ते प्रयत्नशील असतात. त्यामुळेच त्यांना खरा समाजसेवक म्हणून ओळखतात.
प्रतिक्रिया..
तालुक्याचा विकास व्हावा ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. त्याच अनुषंगाने माझे यापुढेही प्रामाणिक प्रयत्न असतील. समाजाप्रती तळमळ कायम राहील.
-अलीम अख्तर नाईक, जेडीएस युवा नेता..

Leave a Reply