,

..जांबोटी बस स्थानकावरील अतिक्रमण हटवा…


जांबोटी समाज सुधारक संघाची पंचायतीकडे मागणी; जाहिरात फलकांनी झाकोळले बस स्थानक…

जांबोटी: लोकहित न्यूज

       जांबोटी हे चाळीसएक खेड्यांचे केंद्र असून, येथून बेळगांव,खानापूर , गोव्याला मार्ग जोडतात. मात्र, या सर्व ठिकाणी जाण्यासाठी जांबोटीत असलेला बस थांबा आजूबाजूने जाहिराती फलक आणि अतिक्रमनांनी झाकोळला आहे, त्यामुळे याठिकाणी बस थांबा आहे का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे काहीं प्रवाशांना बस स्थानक कुठे आहे हे कळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जांबोटी ग्राम पंचायतीने याचा पाठपुरावा करून तत्काळ बस स्थानक मोकळे करून द्यावे अशी मागणी जांबोटी समाज सुधारक संघ आणि मंजुनाथ ( अरुण) महाराज यांनी केली आहे. शिवाय बस स्थानकाला लागून असलेली अतिक्रमणेही हटवण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

….जाहिरात फलकांची प्रसिद्धी किती दिवसासाठी?

      शहर असो वा ग्रामीण भाग याठिकाणी जाहिरात फलक प्रसिद्धी करण्यासाठी काही दिवसांची मुदत असते. शिवाय त्यासाठी लागणारे शुल्क पंचायती कडून स्वीकारले जाते काय? याचाही विचार होणे गरजेचे आहे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया –

   जांबोटीत बस स्थानक आहे काय? चोहोबाजूंनी बस स्थानक फलक अतिक्रणानी झाकले आहे, प्रवाशांना कसे कळणार? याचा पाठपुरावा ग्राम पंचायतीने करावा अशी आमची मागणी आहे.

  • मंजुनाथ(अरुण) महाराज कणगुटकर, अध्यक्ष जांबोटी सेवा संघ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *