उपस्थित इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; कृषी पत्तीन संघ अध्यक्ष संचालक समर्थकांची जत्राच…
बेळगांव: लोकहित न्यूज
दोन महिन्यानंतर होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम आतापासूनच सुरू झाली आहे. जारकीहोळी बंधू, हेब्बाळकर, कत्ती, सवदी या दिग्गज नेत्यांमध्ये कस लागण्याचे चिन्हं दिसत आहे. ही निवडणूक पक्षविरहित अर्थात पक्ष सोडून प्रत्येक नेत्याच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे, यात तिळमात्र शंका नसेल! दुसरी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डीसीसी बँकेच्या राजकारणावर बहुतेक नेत्यांचे राजकारण अवलंबून असते. यात जो कोणी बाजी मारेल तोच विधान सभा, लोकसभेच्या निवडणुकीत चमकेल असे गणित आहे. त्याची रंगीत तालीम आजच्या डीसीसीच्या 104 व्या वार्षिक सभेवेळी पहायला मिळाली. दोन महिन्यांपूर्वी अचानक अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या माजी खा. रमेश कत्ती यांची हलचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे समजणे कठीण आहे. पण, त्यांनी आजच्या बँकेच्या वार्षिक सभेकडे पाठ फिरवल्याचे ते पुरते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिवाय त्यांच्यासह काहीं संचालकही हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे आजच्या बैठकीपेक्षा त्यांच्या गैरहजेरीचीच चर्चा अधिक रंगजल्याचे दिसून आले. त्यामुळे हे राजकारण कोणत्या वळणावर जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
…बँक बुढवणारे बाहेर गेले; बँकेचे हितचिंतक उभे आहेत: भालचंद्र जारकीहोळी…
डीसीसी बँकेचे हीत साधणारे इथे उभे आहेत तर बुढवनारे बाहेर पडले आहेत असा सूचक इशारा आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी दिला आहे . तो माजी अध्यक्ष रमेश कत्ती यांच्यावरून की, आणखी कोणासाठी? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. बुधवारी बेळगांव येथील गांधी भवनमध्ये झालेल्या 104 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की , बँकेने 4 हजार शेतकऱ्यांना कर्जे दिली आहेत. बँक मजबूत स्थितीत असून, कोणीही काळजी करण्याची गरज नाही. कृषी पत्तींनच्या अध्यक्षांनी चिंता करू नये. बँक अडचणीत आणणारे बाहेर फेकले गेले आहेत. सौभाग्य साखर कारखान्याला दिलेले कर्ज व्याजासहित वसूल जाईल असे सांगतानाच, अप्पासाहेब कुलगोड अध्यक्ष झाल्यापासून बँकेची प्रगती झाली आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बीडीसीसी बँकेचे संचालक महांतेश दोड्डगौढर यांनी बोलतांना महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, आणखी दोन महिन्यानंतर कृषी पत्तींन संघांनी खाते उघडायचे असल्यास मुख्य कार्यालयात येण्याची गरज नाही तर आपापल्या संघ कार्यालयातच खाते उघडता येईल असे स्पष्ट केले. यावेळी खानापूर संचालक अरविंद पाटील, राजेंद्र सोनटक्की यांच्यासह जिल्ह्यातील प्राथमिक संघांचे अध्यक्ष संचालक व त्यांचे हितचिंतक उपस्थित होते.

…खानापूरमध्ये कांटे की टक्कर; काँग्रेस -भाजपसह सर्वच पक्षाचे नेते दिसताहेत एकत्र …
खानापूरमध्ये विद्यमान संचालक अरविंद पाटील यांच्या बाजूने माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी उभे असून ते आम्हीं सर्व बंधू एकत्र असल्याचे प्रत्येक ठिकाणीं सांगत आहेत. परंतु, माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि विद्यमान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भालचंद्र यांच्या सांगण्यात कितपत तथ्य आहे हे सद्या तरी सांगणे कठीणच आहे. तर दुसरीकडे राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नाराज हट्टीहोळी यांनी जोरदार तयारी चालविली आहे. हट्टीहोळी यांच्यामागे आमटे कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांच्यासह काहीं अनुभवी नेत्यांची फळी उभी आहे. शिवाय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपणही रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. तर माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वतः उभ्या राहतात की, आ. हलगेकर यांनाच पाठिंबा देतात? याबाबत ‘गुप्तगु’ आहे. त्यामुळे यंदाचे डीसीसी बँक ‘इलेक्शन ‘ तितके सोपे नसणार आहे. कोणाला कोण सापोट करणार कोणाचा कोण दोस्त होणार? हे सांगणे तसें कठीणच! कोणाचा बदला कोण घेणार, तर काहीं जण मागचा वचपा भरून काढण्याच्या प्रयत्नात आहेत.
Leave a Reply