भागांतील नेत्यांकडून दौलतरावांच्या निवस्थानी सदानंद पाटील यांना पुष्पहार घालून शुभेच्छांचा वर्षाव!
जांबोटी: लोकहित न्यूज
तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचा तालुक्याचा भार सांभाळणारे तसेच खानापूर लैला शुगरचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सदानंद पाटील यांचा वाढदिवस जांबोटी भागातील प्रभावी भाजप नेते दौलतराव कोलीकर यांच्या निवासस्थानी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. भागांतील नेत्यांकडून हार ,शाल घालून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप नेते दौलतराव कोलीकर, खानापूर पीएलडी बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर, कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चीगुळकर, माजी ग्राम पंचायत सदस्य पुंडलिक ल. पाटील, माजी ता. पं. सदस्य चिदंबर गांवकर, हब्बनहट्टी मारुती देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष नेताजी घाडी,हब्बनहट्टी स्वयंभू मारुती देवस्थान कमिटीचे सचिव संतोष कदम, हब्बनहट्टी कृषी पत्तींन संघाचे संचालक ‘सर्वेसर्वा’ शंकर गावडे, विठोबा दळवी, मारुती मंदीर देवस्थान समितीचे सदस्य सखाराम धूरी , पवन गायकवाड, प्रभाकर शेंगाळे, राजू कुर्लेकर, राजू तलवार, रामचंद्र कोलीकर, राजू कुरलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनिल चीगुळकर यांनी स्वागत केले. तर दौलत कोलीकर यांनी आभार मानले.
.. एमडी सदानंद पाटील यांच्याकडून सर्वांचे आभार….
तालुक्याच्या सर्व स्तरांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्या सर्व शुभचिंतकांचे एमडी सदानंद पाटील यांनी एकाच शब्दात आभार मानले. शिवाय तालुक्याचा विकास करण्याबरोबरच समस्या सोडवण्यास सदैव आम्हीं कार्यतत्पर आहोत असाही संदेश पाटील यांनी तालुकावासियांना दिला आहे.
….जांबोटीत विविध विषयावर चर्चा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर श्री स्वयंभू मारुती देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष -सदस्यांनी देवस्थान विकासाबद्दल एमडी सदानंद पाटील यांच्याशी चर्चा केली. राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देवस्थानसाठी दिड कोटी निधी मिळवून देण्याचा तयारी दर्शविली आहे. तरी आ. विठ्ठल हलगेकर यांच्या माध्यमातूनही देवस्थान विकासासह जांबोटी भागातील रस्ते, आरोग्य,शिक्षण अशा समस्या सोडण्यात याव्यात अशी मागणी पाटील यांच्याकडे यावेळी करण्यात आली रो. त्यावर बोलताना पाटील यांनी तालुक्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यातून अत्यावश्यक समस्या दूर करण्यासाचे आमचे प्रयत्न असतील असे स्पष्ट केले.

Leave a Reply