मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; अनेक तर्क-वितर्क?..


हिंदी हवी कशाला? विविध संपादकांनी लिहिलेले पुस्तक उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांना भेट..

मुंबई: लोकहित न्यूज नेटवर्क..

     महाराष्ट्र राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या हिंदी सक्तीमुळे राज्यातील राजकारण जणू ढवळून निघाले आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या बंधूंनी एकत्र येवून आंदोलनाचे अस्त्र उगारताच सरकारने नमते घेत सदर सक्ती मागे घेतली. त्यानंतर  अनेक आरोप -प्रत्यारोपही झाले. त्यानंतर परवाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ थोड्याच दिवसात संपणार आहे, त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन असल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उपस्थित होते. त्यावेळीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिश्कीलपणे सत्ताधारी पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट ‘हिंदी  हवी कशाला? हे पुस्तक भेट देण्याच्या निमित्ताने झाली. उद्धव ठाकरे यांनी विविध संपादकांनी अनुवादित केलेले हिंदी कशाला हवी? हे पुस्तक देवेंद्र फडणवीस व सभापती राम शिंदे यांना भेट दिले. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात झाली. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

तब्बल 20 मिनिटांची पुस्तक भेट;; अनेक चर्चांना उधाण ..

    म्हणतात ना….राजकरणात कोणी कोणाच्या शस्त्रू नसतो आणि कोणी कुणाचा मित्र! या उक्तीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांची भेट तीही दोनच दिवसात? निमित्त जरी पुस्तकाचे असले तरी राजकीय वर्तुळात तर्क -वितर्क  व्यक्त केले जात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे तोपर्यंत कोण -कोणते राजकीय बदल होतात याचा अंदाज लावणे कठीण आहे. परवाच्या अंबादास दानवेंच्या निरोप समारंभ कार्यक्रमात सरकारमधील उपमुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांना एका रांगेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती राहूल नार्वेकर यांनी साधा नमस्कारही केला नाही. तेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एंट्री होताच याच मंडळींनी उठून उभे राहून नमस्कार केला, शिवाय बसण्याची विनंती केली. त्यावरून शिंदेचे पुढे काय होणार? असाच प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला नसेल तर नवलच! सद्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा (उबाठा) बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यामुळें याचीच ही चाचपणी की, पुढची राजकीय खेळी? असाच प्रश्न उपस्थित होतो आहे.

  

      


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *