खानापूर च्या समर्थ इंग्रजी माध्यम स्कुलतर्फे घेण्यात आलेल्या 9 व्या अखिल भारतीय निमंत्रित कराटे स्पर्धेत आदिती डी. नाडगौडा हिला चॅम्पियनशिप मिळाली आहे. तिने कुमीत स्पर्धेत सुवर्ण पदक तर कात या प्रकारात कास्य पदक पटकावले आहे. त्याबद्दल जिल्हा व तालुक्यातून तिचे कौतुक होत आहे. अदितीकडून प्रथमच बेळगांव कराटे क्लब मध्ये यश संपादन केले आहे. तिला मास्टर गजेंद्र बी. काकतिकर यांचे मार्गदर्शन मिलत असून, प्राचार्य दिव्या डी. नाडगौडा यांचे सहकार्य लाभले आहे. आदिती ही खानापूर डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष तसेच समर्थ इंग्रजी स्कूलचे सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा यांची कन्या होत.

Leave a Reply