बैलुर, तोराळी, देवाचीहट्टी गावकऱ्यांचा इशारा ; पीडब्ल्यूडी अधिकारी संजय गस्ती यांच्याशी ‘संपर्क ‘..
बैलुर : लोकहित न्यूज
आधीच क्षणा -क्षणाला जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करायला लागणाऱ्या बैलुर (ता.खानापूर) रस्त्याचा विकास रखडला असताना, साधी दुरुस्तीही करणे पीडब्ल्यूडी ला जमेना. त्यामुळें संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात निर्णय घेतला होता. त्याची दखल घेत पीडब्ल्यूडी खात्याने आणखी दोन दिवसाची मुदत मागितली आहे, त्यानुसार नागरिकांनी सदर रास्ता रोको दोन दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी दोन दिवसात या जीवघेणे खड्डे न बुजवल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना नेते विठ्ठल राजगोळकर यांनी नागरीकांच्यावतीने ‘लोकहित न्यूज’ शी बोलताना दिला आहे.
….कोणतीही जीवितहानी घडल्यास ‘पीडब्ल्यूडी ‘ जबाबदार असेल!
रस्त्यावरील देवाचीहट्टी फाटा ते जंगलातील एक किमी चा रस्ता, बैलुर गावं ते फाट्यापर्यंत 4 किलो मीटरच्या रस्त्याला जीवघेणे ठरू पडले . दिवसेंदिवस हे खड्डे रुद्ररूप धारण करत आहेत. परिणामी कधी? कोणत्या वाहनाचा अपघात घडेल याची शाश्वती नाही. आत्तापर्यंत दोन मालवाहू ट्रक पलटी होवून नुकसान झाली आहे. परंतु, यापुढे या रस्त्यावर कोणतीही जीवितहानी घडल्यास त्याला पीडब्ल्यूडी खाते जबाबदार असेल असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
…आमदार काय म्हणतात….
बैलूर रस्त्यासाठी मंजुर झालेल्या 4 कोटी निधीतून पक्क्या रस्त्याचे काम होईल. दोन कंत्रादारांकडून टेंडर भरल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तो आता दूर झाला असून, पाऊस कमी झाल्यानंतर या कामाला सुरवात होईल. पण, तत्पूर्वी खड्डे भरण्याची सूचना पीडब्ल्यूडी ला केली आहे. ते काम दोन दिवसात होईल. तसेच तालुक्यातील रस्त्यांसह इतर विकास कामांचा प्रस्ताव सरकारदरबारी पाठवला आहे. तोही लवकरच मंजूर होईल.
-विठ्ठल हलगेकर, आमदार..

Leave a Reply