महाराष्ट्र – केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश; शिवप्रेमींकडून सरकारचे अभिनंदन..
मुंबई: लोकहित न्यूज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील राजधानी रायगडसह 11 किल्ल्यांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत सामावेश करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्राची कातळ शिल्पे’, आणि ‘मराठा लष्करी स्थापत्य कला, अशी यादी केंद्रीय पुरातत्व खात्याकडे सादर केली होती. केंद्राकडे यादी सादर केली होती, त्याची निवड केंद्राकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युनेस्को कडे पाठपुरावा करण्याची सूचना पुरातत्व खात्याला दिली होती. तर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतीक पातळीवर पाठपुरावा केला आहे. त्यामुळें शिवप्रेमींतून केंद्र आणि राज्य सरकारचे कौतुक केले जात आहे.
…कोणत्या किल्ल्यांना जागतिक ‘मानांकन ‘
युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणीक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेकडून महाराष्ट्रातील स्वराज्याची राजधानी रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी असे एकूण 11 किल्ले महाराष्ट्र तर जिंजी या तामिळनाडूतील किल्ल्यांना युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत सामावेश करण्यात आला आहे. त्यामुळें शिवरायांच्या मराठा साम्राज्याची (स्वराज्याची) महती जगभर पोहचणार आहे.

Leave a Reply