पंचायतीकडून पाहणी; मुलांच्या वाटेवरील दर्शनी बाजूची भिंतही काढण्याची गरज, सतर्कता बाळगण्याचे पंचायतीचे आवाहन…

जांबोटी : लोकहीत न्यूज
जांबोटी (ता. खानापूर) येथील मराठी लोअर प्राथमिक शाळेची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. परिणामी भिंतीखाली डेस्क सापडून्ही नुकसान असून, मुले ये – जा करण्याच्या दर्शनी बाजूची भिंतही कोसळण्याच्या मार्गावर आहे. तरी शाळा सुधारणा समिती आणि शिक्षकांनी सतर्कता बाळगून त्या बाजूला मुलांना पाठवू नये, असे आवाहन ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई ,पीडिओ राजू तळवार यांनी केले आहे. गेल्या चार दिवसात या भागात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जुनी असलेल्या त्या शाळेच्या भिंतींना फटका बसला आहे. या घटनेची जांबोटी पंचायतीकडून पाहणी करण्यात आले असून, तसा अहवाल तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . घाडी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद डांगे, संतोष कुर्लेकर, संतोष पाटील उपस्थित होते.
चौकट –
….पडण्याच्या मार्गावर असलेली भिंत पाडण्याची गरज..
मुले ये -जा करण्याच्या बाजूची सदर पडण्याच्या मार्गावर असलेली भिंत तत्काळ पाडण्याची गरज आहे. कारण मुलांना ये जा करण्यासाठी ती एकच वाट असल्याने याची पंचायत आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने दखल घ्यावी अशी मागणी पालकातून होत आहे.
जांबोटी भागात घरे, शेतिपिकांची नुकसान …
गेल्या आठवड्यापासून जांबोटी भागात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे झाडे, घरे , शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या भात बियाण्याची कुजून नुकसान झाले आहे. जांबोटी भागातच जुनी शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी येथील शाळेमध्ये हजारो विद्यार्थी घडले. त्या आठवणीतल्या शाळेच्या भिंती पडत असल्याने माजी विद्यार्थ्यांकडून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
Leave a Reply