दोन लाखाहून अधिक किंमतीची दारू चोरी; पोलिसांचा पंचनामा…


जांबोटी सरकारी बार दारू बॉक्स चोरी प्रकरण; श्वानकडूनही तपास, अद्याप तरी पोलिसांचा तपास सुरूच..

  जांबोटी:: लोकहित न्यूज

        जांबोटी येथील सरकारी बारमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चोरीत तब्बल दोन लाखाहून अधिक किंमतीचे 45 दारुचे बॉक्स लांबविल्याचे उघड झाले आहे. दोन दिवस पोलिसांचा तपास वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे, मात्र, रविवारपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. रविवारी श्वान पथक बार आणि बाजूच्या परिसरात फिरविण्यात आले, जांबोटी पोलिसांचा कालपासून तपास सुरू आहे तर आज ( रविवार) पोलिस निरीक्षक गवंडी यांनी घटनास्थळी भेट घेऊन स्थानिक माहिती देणाऱ्यांची साक्ष आणि साक्षीदारांच्या सह्या आदी कायदेशीर बाबी करुन घेतल्या. त्यांच्या समवेत जांबोटी पोलिस उपसहायक निरीक्षक बाहुबली व त्यांचा सहकाऱ्यांनी कसून चौकशी केली.

..स्थानिक सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीच निष्पन्न नाहीं;; पोलिसांसमोर आव्हान..

         जांबोटी बस स्थानकावरील काहीं हॉटेल व रस्त्यावरील कॅमेऱ्यात चेक करून पाहण्यात आले पण, त्यात काहीच हाती लागले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर एक प्रकारचे आव्हानच उभे राहिले आहे. ते त्यांनी कशाप्रकारे पेलतात हे पहावे लागेल. या प्रकरणाच्या छडा लागला तर खानापूर तालुक्यातील इतरही गुन्हेगार शोधण्यास पोलिसांना सोपे जाईल..

..जांबोटी स्थानकावरील कॅमेऱ्यांचा ताबा पोलिसांकडेच…

      जांबोटी आणि जांबोटी नाका या दोन महत्वाच्या ठिकाणी मोठें कॅमेरे जांबोटी ग्राम पंचायतीने बसविले आहेत. वर्षभरापूर्वी येथील केव्हीजी बँकेत चोरीचा प्रकार घडला तेंव्हा तत्कालीन पोलीस हवालदार जगदीश यांनी आपल्याकडे फुटेज कनेक्शन घेतले असून, त्यामुळे सदर कॅमेऱ्यांचा ताबा पोलिसांकडेच असल्याचे पंचायतीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशी घटना घडली तरच जाग येते शिवाय कॅमेऱ्यांची आठवण होते. नाहीं तर ये रे माझ्या मागल्या च.. त्यामुळे जांबोटी सुक्षित्तता कशी राखणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *