..सोसायटीचे भवितव्य सभासदांच्या हाती: संस्थापक -चेअरमन विलास बेळगावकर..


जांबोटी मल्टी पर्पज सोसायटीची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा:  22लाख 22 हजार 807 रुपयाचा निव्वळ नफा..

   

सोसायटी ही सभासदांची अमानत आहे, तीची काळजी घेणे हे सभासदांचे कर्तव्य आहे. यात मुख्य म्हणजे घेतलेले कर्ज वेळेत भरण्याबरोबर पारदर्शक व्यवहार ठेवका पाहिजे. आजच्या घडीला घेतलेल्या कर्जाची वसुली म्हणजे कळीचा मुद्दा ठरत आहे का? यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे असून, सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत भरणे , सोसायटीच्या हिताबाबत गांभीर्याने विचार केला तरच सहकार क्षेत्र टिकेल असे मत, जांबोटी को.ऑप.सोसायटीचे संस्थापक चेअरमन -विलास बेळगावकर यांनी मांडले. जांबोटी को .ऑप सोसायटीच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत . उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यानी स्वागत केले.

     व्यासपीठावर उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, संचालक अण्णासाहेब कुडतुरकर, पांडुरंग नाईक, शाहू गुरव, यशवंत पाटील, भैरू पाटील, विद्यानंद बनोशी, रायप्पा काजूनेकर,  हणमंत काजूनेकर, पुंडलीक गुरव, भाऊ कुर्लेकर, भरमानी नाईक, जी. व्ही. इंगळे, सरस्वती पाटील व सल्लागार उपस्थित होते .  उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी स्वागत केले. अहवाल वाचन अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी केले. मागील इतीहासवृतांत वाचन सेक्रेटरी दिलीप हन्नूरकर यांनी केले. बैलुर शाखेचे मॅनेजर गजानन नाकाडी यांनी नफा – तोटा पत्रकाचे वाचन केले.  ताळेबंद पत्रकाचे वाचन खानापुर शाखेचे मॅनेजर सुर्यकांत बापसेट यांनी केले. 2025- 26 च्या अंदाज पत्रकाचे वाचन राधा दळवी यांनी केले. पुढे बोलतांना, श्री, बेळगावकर म्हणाले की, गोरगरीबांना सावकार शाहीतून मुक्त करण्यासाठी सभासदांच्या सहकार्याने आम्हीं सहकार क्षेत्रात पाऊल टाकले आहे, त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे, त्याची आठवण प्रत्येकाने ठेवून सोसायटीच्या पुढील वाटचालीत हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जय हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत यांनीही कर्जदारांनी वेळेत कर्ज भरले तरच सोसायटी टिकेल असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.

.. असा पार पडला कार्यक्रम ..

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, बाबुराव भरणकर, शिवाजी होनगेकर, शामराव साबळे, बाळू किणारी, अर्जुन गावडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तर शिवाजी हसणेकर, रामा कालमणकर यांच्याहस्ते फोटो पूजन करण्यात आले.

..प्रामाणिक कर्जदार आणि जेष्ठ सभासदांचा सत्कार..

    यावेळी प्रामाणिक कर्जदार म्हणून सुधाकर म्हात्रू गावडे, जोतिबा राघोबा चौगुले, अप्पणा गुंडू दळवी, अदाव फिलिप्स लोबो यांचा… तर जोतिबा ता. कोवाडकर, विठ्ठल र. देसाई, पांडुरंग पा. शिनोळकर, सरस्वती कृ. बेळगावकर, गंगुबाई भा. येडगे यांचा जेष्ठ सभासद म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. संचालक यशवंत भ. पाटील यांनी आभार मानले.

चौकट –

…सोसायटीची घोडदौड अशी…

     अ वर्ग सभासद – 1750.

     क वर्ग सभासद – 857.

     भागभांडवल – 1,06, 47, 050.

       ठेवी          – 39,64,27,387.

     गुंतवणूक    – 3,17,28 ,386.

     खेळते भांडवल – 43,24,94,620.

    वार्षिक उलाढाल – 95 ,73,14,992.

    राखीव निधी व इतर निधी – 2,43,06,992.

                              कर्जे     – 32,92,91,714.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *