तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांचे ते आजोबा; त्यांची अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी..
खानापूर : लोकहित न्यूज
1930 साली सन्न होसुर ( ता. खानापूर) येथे जन्मलेल्या तसेच त्याकाळच्या स्वातंत्र्य लढयात भाग घेतलेल्या दत्तू कल्लाप्पा पाटील यांच्या 95 व्या वाढदिवसाने त्याकाळातील आठवणी आजही ताज्यावाणी झाल्याचे मत तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना मांडले. स्वातंत्र्य लढ्यातील साक्षीदार दत्तू कल्लाप्पा पाटील यांचा त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या थाटात 95 वा वाढदिवस साजरा केला. खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांचे ते आजोबा होत. दत्तु पाटील यांचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी काहीं काळ मुडेवाडी येथे शिक्षक म्हणूनही सेवा बजावली आहे. त्यांनी स्वतंत्र लढयातही भाग घेतला होता. त्यामुळे त्यांचे नाव तालुक्यात अग्रस्थानी घेतले जाते. दत्तु पाटील यांना तीन मुलगे एक मुलगी आठ नातू, पाच नाती, परतवंडे असा मोठं परिवार आहे.
..आजोबा हे स्वातंत्र्य लढ्यातील साक्षीदार: भरमानी पाटील
आमचे आजोबा हे स्वातंत्र्य लढ्यातील साक्षीदार आणि सेनानी आहेत, त्यांनी देशसेवा आणि शिक्षकाच्या माध्यमातून समाजाला साक्षर बनवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ते सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे एकमेव व्यक्तीमत्व असं मी म्हणेन असेही ते म्हणाले. 95 व्या वाढदिंनानिमित त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थीत होते. असेही पाटील यांनी सांगितले.







Leave a Reply