खानापूर तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा; मंडळांची भाग घेण्याचे आवाहन…
खानापूर : लोकहित न्यूज
उत्तम घरगुती गणपतीची सजावट करा आणि खानापूर तालुक्यात ‘झळका’ असे ब्रीद वाक्य देत ‘खानापूर वार्ता’ यांच्यावतीने घरगुती ‘मखर सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. त्याला खानापूर येथील राजमाता जिजाऊ गणेश मंडळाचेही सहकार्य लाभले आहे. स्पर्धकांनी स्वतःच्या घरात केलेल्या मखर सजावटीचा 30 ते 60 सेकंदाचा उभा (व्हर्टीकल) व्हिडिओ- 8088101547 whattupps क्रमांकावर पाठवायचा आहे. ते व्हिडियो खानापूर वार्ताच्या इस्टाग्राम पेजवरून अपलोड केले जाणार आहेत. यातील विजेत्यांना अनुक्रमे 7777, 5555, 3333, 1111, 555, सहाव्या विजेत्याला मानचिन्ह तर स्पर्धेत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी हौशी मंडळांनी भाग घ्यावा असे, आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.







Leave a Reply