एक थेंब उत्तम ‘बाल’ आरोग्यासाठी: आ. विठ्ठल हलगेकर


तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण उद्दिष्ट पूर्ततेकडे ; पाच वर्षांखालील बालकांना करण्यात आले लसीकरण…

माणिकवाडी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

      हजारों वर्षांपूर्वी  संपूर्ण जगालाच घाबरवून सोडणाऱ्या पोलिओ हा आजार अलीकडे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असला, त्यामध्ये केव्हाही वाढ होऊ शकते, यामुळेच दरवर्षी दोन ते टप्यात सरकार हजारो कोटी खर्च करून पोलिओ लसीकरण मोहीम राबवत असते. खानापुरात शिंदोळी ग्राम पंचायत हद्दीतील माणिकवाडी गावात पोलिओचा तालुका लसीकरण कार्यक्रम पार पडला. बालकांना पोलिओ डोस दिल्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एक थेंब बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी असल्याचे जाहीर केले, शिवाय या मोहिमेमुळे देशातील पोलिओ हा आजार सरकारच्या सतर्कतेमुळे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असल्याचेही ते पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी माणिकवाडी गावचे ग्राम पंचायत सदस्य शंकरगौडा , तालुका आरोग्य अधिकारी महेश कीडनावर, पीडियो जोतिबा खामकर, डॉक्टर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

काय आहे पोलिओ आजार? तो कधीपासून सुरू झाला आणि सध्याची त्याची परिस्थिती काय आहे….

हजारों वर्षांपूर्वीचा पोलिओ हा आजार असून,इजिप्शियन देशांमध्ये त्याचे पुरावे सापडतात . पण, 20 व्या शतकात या रोगाच्या साथीने उग्र रूप धारण केले होते. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1950 साली या रोगावर लस निघाली अन् जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. 1990 मध्ये भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला, तर 1995 मध्ये भारतात पहिला डोस बालकांना देण्यात आला.  त्यामुळे या कार्यक्रमाला आज 31 वर्षे पूर्ण होत असून, यामुळे पोलिओ हा आजार सरकारच्या सतर्कतेमुळे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वर्षातून एक -दोन वेळा पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रम भारतात राबविला जातो. अलीकडे वैद्यकीय विज्ञान प्रगत झाले असले तरी 5 वर्षांखालील बालकांच्या  आरोग्यासाठी पोलिओ डोस वरदानदायी ठरला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सध्या भारतात पोलिओ हा आजार जवळपास आटोक्यात आला असल्याचेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया –

पोलिओ लसीकरणामुळे अनेक आजारांवर होते मात…

     ज्यावेळी बालकांच्या शरीरामध्ये वाढ होत असते त्याचवेळी या पोलिओ डोस ची आवश्यकता भासत असते.  पाच वर्षांखालील बालकांच्या आरोग्यामध्ये बरेच बदल घडण्यास सुरवात होत असते. त्यामुळेच सरकारने याच वयात पोलिओ डोस देण्याचे आयोजन केले आहे. सध्या तरी हा आजार बऱ्यापैकी कमी झाला असला तरी पोलिओ लसीकरण मोहीम राबविणे हे सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे.

महेश कीडनावर , तालुका आरोग्याधिकारी.

पोलिओ आजार ही एक मोठी समस्या असून, ती साधारण पाच वर्षांखालील बालकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे सरकारने याचवेळी हा पोलिओ डोस देण्याचे आयोजन केल्यामुळे बालकांना तो एक बूस्टर डोस ठरला आहे.

शंकरगौडा , ग्राम पंचायत सदस्य माणिकवाडी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *