आ. हलगेकर, जि. भा. उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, मा. ता. भा. अध्यक्ष संजय कुबल यांच्यासह भाजप नेत्यांची बैठक संपन्न…
खानापूर : लोकहित न्यूज
गेला महिनाभर मृतदेह प्रकरणामुळे प्रसिद्ध देवस्थान श्री धर्मस्थळ तीर्थक्षेत्राची विनाकारण बदनामी काहीं समाजकंटकांनी सुरू केली आहे. त्यामुळे श्री धर्म स्थळाच्या समर्थनार्थ (उद्या) सोमवार 25 रोजी खानापुरातून विविध हिंदू संघटनांच्यावतीने भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत नुकतीच खानापूर येथील बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी धर्म स्थळासारख्या प्रसिद्ध देवस्थानाची होत असलेली बदनामी थांबली पाहिजे, तसेच जाणीवपूर्वक बदनामी चालविलेल्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आदी विषयावर यावेळी चर्चा,विनिमय करण्यात आले. तसेच तालुक्यांतील हिंदू संघटना तसेच तालुक्यातील बांधवांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन,आ. विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल यांनी केले आहे. खानापूर येथील स्टेशन रोड ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा भाजप अध्यक्ष बसवराज सानीकोप, सचिव गुंडू तोपिनकट्टी, मल्लापा मारीहाळ, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, राजेंद्र रायका, महादेव गांवकर, धनश्री सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.






Leave a Reply