कथीत मनी लॉड्रिंग प्रकरण ; याप्रकरणी चीत्रदूर्गचे काँग्रेस आ.विरेंद्र कुमार उर्फ पप्पी यांना गंगाटोक येथून अटक; बंगळूर येथील ईडी झोनच्या चौकशी सुरू..

बंगळूर: गांगाटोक: लोकहित न्यूज नेटवर्क
कथीत मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सक्तवसुली संचालनालयाने ( ईडीने) गोवा, मुंबई, चीत्रदूर्ग, हुबळी, जोधपूरसह 31 ठिकाणीं टाकलेल्या छाप्यात कोटींचे घबाड हाती लागले असून, याप्रकरणी चीत्रदुर्गचे काँग्रेस आमदार विरेंद्र कुमार उर्फ पप्पी यांना शनिवारी सिक्कीममधून अटक करण्यात आली आहे. कथित ऑनलाइन व ऑफलाईन सट्टेबाजी, रॉकेट चालवल्याचा आरोप पप्पी यांच्यावर असून, बंगळूर ईडी झोनमध्ये तपास सुरू आहे.
गोव्यातील सात कॅसिनोवरही छापे…
या संबधित असलेल्या गोव्यातील सात कॅसिनोवरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत, ईडीच्या माहितीनुसार बराच काळा पैसा यामध्ये वळल्याचा आरोप वीरेंद्र यांच्यावर असून, त्यांचे कुटुंबीयही त्यामध्ये सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दोन दिवस चाललेल्या ईडीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात संपती जप्त केली आहे. त्याचाही तपास सुरू आहे.
..12 कोटी रोक रक्कम, 6 कोटी मूल्याचे सोने, दहा किलो चांदीची भांडी व चार आलिशान वाहने जप्त..
ईडीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडीत कोटींचे घबाड हाती लागले असून, 12 कोटी रोख रक्कम त्यात परदेशी चलनातील अंदाजे 1 कोटींचा समावेश आहे, 6 कोटी मूल्याचे सोने, दहा किलो चांदीची भांडी, मोठ मोठ्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे हाती लागली आहेत.
..कोणती कारवाई झाली?
या प्रकरणी वीरेंद्र यांची 17 बँकांमधील खाती गोठवण्यात आली आहेत, तर तपासादरम्यान वीरेंद्र यांच्या कुटुंबीयांचीही भुमिका उघडकीस आली असून, त्यांचें भाऊ के.शी. नागराज, मुलगा पृथ्वी एन . राज, यांच्या घरातून मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे हाती लागली आहेत. तर दुसरे भाऊ केसी थिप्पेस्वामी हे दुबईतून थेट गेमिंग हाताळत होतें असा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. तर पप्पी यांना ट्रानझिट रिमांडमध्ये घेण्यात आले असून, गांगाटोक येथून अटक करून बंगळूर येथील न्यायाधीशांच्यासमोर हजर करून येथील ईडी च्या अधिकारी क्षेत्रात घेवून ट्रानझिट रिमांड मिळवण्यात आला असून, बंगळूर ईडी झोनमध्ये तपास सुरू आहे.
…या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ ….
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांवर मनी लांड्रिंग सट्टेबाजीचे एवढे मोठे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ही कारवाई पक्षासाठी अडचणींची ठरणार का? असे राजकीय संकेत मिळत आहेत..






Leave a Reply