जांबोटी उपतहसीलदार कार्यालयात जमीन ‘खरेदी करण्यासाठी’ 30 हजाराची मागणी: शंकर सडेकर यांचा आरोप…


सहा महिन्यानंतर पुन्हा  तहसीलदार कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर ..

   जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

            तालुक्यात नेहमीच चर्चेत राहिलेल्या तहसीलदार कार्यालयातील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जांबोटी उप तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘जमिन रयतावा, सब रजिस्टर चलन भरलेले असतानाही सदर जमीन खरेदीसाठी  चक्क 30 हजाराची मागणी केल्याचा आरोप माजी ग्राम पंचायत सदस्य तसेच जांबोटीचे प्रभावी नेते शंकर सडेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना केला आहे. त्यामुळे भागात एकच खळबळ माजली आहे. कारण, मागच्यावर्षी बेकायदेशररित्या संपती जमविलेल्या तत्कालीन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना लोकायुक्त पोलिसांनी सिद्ध केल्यानंतर सरकारने बडतर्फ केले होते. त्याचकाळात सर्वे कार्यालयातील अधिकाऱ्यांना घरची वाट धरावी लागली होती. त्यामुळे दोन महिने तरी तहसीलमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी डोके वर काढले आहे, त्यामुळेच जांबोटी उपतहसिलदारांकडून जमिनीचा जमिन खरेदी करण्यासाठी  30 हजाराची मागणी केली असे शंकर सडेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले आहे.

   

..जांबोटी तहसिलमधील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर.. तहसीलदार लक्ष देणार का?

  अनेक वर्षांपासून जांबोटी तहसीलदार कार्यालयातील कारभाराची चर्चा रंगत आहे, याठिकाणी ‘वृध्दप पगार ‘ मध्येही गोंधळ आहे, साठपेक्षाही कमी वय असलेल्यांनाही वृद्धप पगार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे..  लोकहित न्यूज तर्फे लवकरच या प्रकरणाचा पंचनामा करण्यात येईल. शिवाय बारीक सारीक कामासाठीही पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अलीकडेच तहसीलदार म्हणून कार्यभार हाती घेतलेल्या तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारण्यात येत आहे.

प्रतिक्रीया –

    माझ्या जमिनीचा रयतावा करुन घेण्यासाठी मी जांबोती तहसिल कार्यालयात गेलो होतो, त्यावेळीं कायद्यानुसार सर्व कागदपत्रे, शिवाय सब -रजिस्टर, सरकारी चलन भरलेले असतानाही माझ्याकडे तहसीलदार कार्यालयात जमीन खरेदी करून नावावर लागण करून देण्यासाठी 30 हजाराची मागणी केली. मी आमदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव घेवून सांगितले, शिवाय मी, एक माजी ग्राम पंचायत सदस्य आहे,असेही बोलून दाखवले. तरीही त्यांनी ऐकून घेतले नाही! आमच्यासारख्या सामाजिक आणि लोकप्रतिनधींशी अशी वागणूक तर मग सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? याचा यावरून अंदाज येईल! मी याची वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.. खानापूर तहसिल कार्यालयमध्येही माझा पेपर कोणी घेण्यास तयार नसल्याने मी खाली हाताने घरी आलो! शिवाय मी आमदारांनाही संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली आहे..

      


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *