July 21, 2026

पालक म्हणतात…समर्थ’ची सामर्थ्यता वाढली…

0
IMG_20250827_090016.jpg

समर्थ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालकमेळावा; सुधारणेबद्दल समाधान; डॉ. डी.ई.नाडगौडा यांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे..

 

खानापूर : लोकहित न्यूज

         खानापूर येथील समर्थ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 2025- 26 चा पालकमेळावा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव डॉ. डी .ई.नाडगौडा होते. यावेळी समर्थ न्यू इंग्लिश स्कूलच्या विकासाबाबत सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पालक म्हणून बोलतांना, शेख यांनी स्कूलने चांगली प्रगती केली असून,येथून मुलांचे भविष्य घडणार आहे. शाळा व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनामुळे हे शक्य झाले आहे असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. नाडगौडा यांनी पालकांना मार्गदर्शन करताना, पालकांच्या पाठिंब्यामुळे स्कूलचा इतका विकास शक्य झाला आहे. तरीही तुम्हीं आम्हाला वेळोवेळी सुचवत रहावे असे आवाहन, डॉ.नाडगौडा यांनी केले. यावेळी अनेक पालकांनी बोलतांना शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी व्यवस्थापिका दिव्या नाडगौडा, मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर, महमद शेद तिगडी, यांच्यासह सर्व पालक उपस्थीत होते. दिव्या नाडगौडा यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *