जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते पूजन; मा. तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्यासह विविध मान्यवर, ह. प. महाराजांची उपस्थिती..
खानापूर: लोकहित न्यूज
दरवर्षप्रमाणे खानापूर येथील प्रसिद्ध श्री रवळनाथ मंदिरात साजऱ्या होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग सप्ताह सोहळ्याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. त्याचे पूजन जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल, तालुका भाजप सचिव गुंडू तोपिनकट्टी, यांच्यासह खानापुर व भागांतील ह. भ. प महाराज मंडळी उपस्थित होते. यावेळी विविध विविध संत -महंत, देवतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.







Leave a Reply