खानापूर ते नंदगड वोटर अधिकार यात्रा; तालुकावासियांचा मोठा सहभाग...
खानापूर : लोकहित न्यूज
वोट चोरीचा आरोप करत केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली आहे, ती देण्यास आयोग टाळाटाळ करत असतानाच निवडणूक आयोगाला विचारले असता भाजप नेते उत्तर देत आहेत. निवडणुक आयोग स्वतंत्र यंत्रणा असताना भाजप का? उत्तर देते, निवडणूक आयोग विकला विकला गेला की काय? असा घणाघात एआयसीसी सचिव मा. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला आहे. खानापूर ते नंदगड अशी वोटर अधिकार यात्रा आज काढण्यात आली. यावेळी नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सभेत त्या बोलत होत्या.
खानापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हार अर्पण करून पदयात्रेला सुरवात करण्यात आली. नंदगडमध्ये पोहचल्यानंतर डॉ.निंबाळकर यांनी क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मार्केटिंग सोसायटीच्या हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलतांना, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक आयोग आणि भाजपची अभद्र युती आहे की काय? असा प्रश्न उपस्थित करत आयोग लोकशाहीचा आदर करत नाही का? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी आयोगाची माहिती उघड केली आहे , परंतु, आयोग कोणतीच माहिती आपल्याकडून देण्यास पुढे येताना दिसत नाही. जी माहिती आहे ती लोकशाहीच्या मार्गाने दिली पाहिजे असेही त्या म्हणाल्या. खानापुरात आम्हीं जोमाने काँग्रेस पक्ष मजबूत करण्यास सक्षीकरणासाठी आहोत, उगाचच बेळगांवाल्यांच्या नादाला लागून तालुक्यात भलते -सलते उद्योग करू नये असाही सूचक इशारा दिला. केंद्रातील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोटर अधिकार हा धागा पकडून बिहारमधून यात्रेला सुरुवात केली आहे. त्यानंतर खानापूरमध्ये ही यात्रा काढण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, महांतेश राऊत, लक्ष्मी मादार, मल्लिकार्जुन वाली यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी खड्यांध्ये झाडे लावून तालुका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला .







Leave a Reply