सर्वात जुनी आणि केंद्र सरकारी उच्च प्राथ. मायमराठी शाळेचे शनिवार दि. 21 रोजी स्नेहसंमेलन व सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ…
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
निरोप घेताना शाळेचा आज डोळे आले भरुनी! अन् शाळेतील दिवस बनले स्मरणातील पुस्तकातील पाणे! निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा! अशा या भावनिक ओळी आहेत, सातवीच्या विद्यार्थांच्या! काय वर्णू माझ्या शाळेची महती, आम्हीं सर्वजण मिळून शाळेचीच गाणी गाती असे ते विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वर काणी पडती! शनिवारचा दिवस ठरेल आमच्या स्मरणाचा.... शनिवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता. जांबोटी विभागातील केंद्र आणि जुनी शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी मायमराठी उच्च प्राथ.मराठी शाळेचे स्नेहसंमेलन व सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ अशा दुहेरी आठणींच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष महेश जांबोटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून, तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल सोमांना हलगेकर, तालुका शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य व म. ए. समिती नेते जयराम देसाई, म. ए. समिती नेते व जांबोटी सोसा. संस्थापक -अध्यक्ष विलास बेळगावकर, माजी नंदगड जि. पं. सदस्य जोतिबा रेमानी या मान्यवरांच्याहस्ते उद्घघाटन व दीपप्रज्वन पार पडेल. काँग्रेस युवा नेते यांच्याहस्ते सी सी टीव्हीचे उद्धघाटन इरफान तालीकोटी व लोककल्प फाउंडेशनच्या सी. एस. आर मॅनेजर मालिनी वाली यांच्याहस्ते संगणक कक्षाचे उद्धघाटन होईल.

प्रतिमा पूजनासाठी –
माजी यशस्वी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मिलिंद डांगे, क्षेत्र समन्वय अधिकारी मंजुनाथ हत्ती, अक्षर दासोह अधिकारी विनायक जकाती, सीआरपी विठोबा दळवी, माजी सभापती सयाजी पाटील, माजी तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी , शंकर ( अण्णासाहेब) , मा. जांबोटी ग्रा पं. अध्यक्ष महेश गुरव, पंचायत सचिव नारायण पाटील, जांबोटी प्रतिष्ठित पंच गणपती कोटीभास्कर, सिद्धेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल कालमनकर, भीम आर्मी एकता मिशन जिल्हा प्रधान सचिव नागेश पाटील, , जांबोटीचे पंच पांडुरंग गुरव , जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर, जांबोटी बाबुराव ठाकुर कॉलेजच्या प्राचार्या पूजा पाटकर, जांबोटी शाखा भीम आर्मी अध्यक्ष राजू कुर्लेकर, भाजप युवा नेते दौलतराव कोलीकर, लोककल्प फाउंडेशनचे संतोष कदम, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत, भाजप युवा मोर्चे सचिव पवन गायकवाड, आमटे शाळा सुधारणा समिती अध्यक्ष संतोष गुरव, ओलमणी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष राजू चिखलकर, जांबोटी कन्नड शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मंजुनाथ मुतगी , विजयनगर शाळा सुधारणा समिती अध्यक्ष रामू चिंगळे, हबनहट्टी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष तानाजी गावडे, कालमणी शाळेचे माजी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष कृष्णा भरणकर, वडगांव शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सागर दळवी यांच्यासह भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,सहशिक्षक, 7 वीच्या विद्यार्थ्यांचे पालक, माजी शाळा सुधारणा समिती सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

प्रमुख वक्ते…
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, ओलमणी शाहु हायस्कूलचे सहशिक्षक अजित सावंत यांनी उपस्थित राहतील. शाळेच्या मुख्याध्यापिक व्ही. पी. घाडी स्वागत करतील तर सहशिक्षक एम. एच. कालणकर व सहशिक्षिका पी. पी कोरव यानी सूत्रसंचालनाचा भार सांभाळतील.
दुपारनंतर चिमुकल्यांच्या नृत्य कला सादर होतील…
सकाळच्या सत्रात पाहुण्यांचे स्वागत तर दुपारनंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नृत्य कला सादर होईल.. ती कला अनुभण्यासाठी पालक व गावकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती शाळा सुधारणा समितीकडून करण्यात येत आहे…






Leave a Reply