16 वी वार्षिक सर्व साधारण बैठक: 8 लाख 15 हजाराचा नफा, वार्षिक उलाढाल – 27 कोटी 83 लाख 14 हजार तर 9 कोटी 7 लाख ठेवी..
जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
पूर्वीच्या सावकारशाहीतून मुक्त होण्यासाठी सहकार क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळेच गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन समृध्द झाले आहे, मात्र, अद्यापही काहीं प्रमाणात सावकारशाही फोफावली दिसते. त्याला कोणीही बळी न पडता सोसायटी, बँकेत व्यवहार करावा. आजच्या घडीला बँकेपेक्षा सोसायटी हा पर्याय उत्तम आहे, पण, हे क्षेत्र लोकांचेच असून , ते टिकवायचे असेल तर व्यवहार हा पारदर्शक असावा तरच सोसायटीचे जाळे घट्ट राहील, नाही कर्ज घेताना ‘मऊ’ आणि घेतल्यानंतर ‘खाऊ ‘ अशी वृत्ती असू नये असे सांगतानाच, मलप्रभा सोसायटीचा कारभार पारदर्शक ठेवल्यानेच या सोसायटीने आर्थिक ‘गरुडझेप ‘ घेतल्याचे त्यांनी नमूद केले. श्री मलप्रभा सोसायटीची 16 वी वार्षिक सर्व साधारण सभा आज पार पडली. त्यावेळीं प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नारायण कालमणकर होते. सोसायटीच्या तपासनीस संध्या कणगुटकर यांनी स्वागत केले. व्यासपीठावर जांबोटी कृषी पत्तीनच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई, माजी तालुका पंचायत सदस्य चिदंबर गांवकर, माजी तालुका पंचायत सदस्य पुंडलिक पाटील होते. सचिव दिपक गांवकर यांनी अहवाल वाचन केले.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून युवकांनी छोटे छोटे उद्योग उभारावेत: धनश्री सरदेसाई यांचे मत…
आज बहूतेक युवकांना कामधंदे नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यात काहीं जण सावकारशाहीच्या जाळ्यात अडकून पडले आहेत. त्यातून बाहेर येवून सोसायटीच्या माध्यमातून युवकांनी छोटे छोटे उद्योग उभारावेत तर जीवन सुखकर होईल असे मत जांबोटी कृषी पत्तीनच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी मांडले.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य पुंडलिक पाटील, चीदंबर गांवकर, दशरथ पाटील यांचीही भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला, संचालक मंजुनाथ मुतगी यांनी आभार मानले . यावेळी विद्यमान उपाध्यक्ष सुभाष गावडे, माजी अध्यक्ष निंगापा पाटील, संचालक शंकर गावडे, प्रभाकर शेंगाळे , नारायण गोंडे, प्रभावती सुरेश पाटील, टोपांना कलमनकर, शीतल गावडे यांच्यासह परशुराम गावडे, जयराम बळजी, जोतिबा नावलकर, निंगाप्पा बळजी, लक्ष्मण गुरव, संतोष गुरव , भोजू बामणे, काशिनाथ बामणे यांच्यासह सभासद उपस्थीत होते.
..सोसायटीला 8 लाख 15 रुपये चा नफा…
सोसायटीला 8 लाख 15 हजार इतका निव्वळ नफा झाला असून, सभासद ठेवी- 9 कोटी 7 लाख 50 हजार, सभासद कर्जे -;6 कोटी 2 लाख 97 हजार, गुंतवणूक – 2 कोटी 64 लाख 76 हजार , वार्षिक उलाढाल – 27 लाख 83 हजार अशी सोसायटीची सांपतीक स्थिती आहे..







Leave a Reply