बेकवाडच्या शेतकऱ्याला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडून 50 हजाराचे आर्थिक सहाय्य…


युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन….

खानापूर: लोकहित न्यूज..

      मागच्या आठवड्यात बेकवाड (ता.खानापूर) येथील पाण्यात पडून मृत पावलेल्या बैलजोडीचे मालक गुंजप्पा पाटील यांचे राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराजहट्टीहोळी, काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्याकडून सांत्वन करत, 50 हजाराची आर्थिक मदत करण्यात आली. शिवाय आणखी गरज भासल्यास कळविण्याचे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून शेतकरी पाटील यांना करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर नुकसानग्रस्त शेतकरी गुंजाप्पा पाटील यांची भेट घेवून धीर दिला. यावेळी महादेव पाटील, शिवराम के. पाटील, जानकाप्पा पाटील, यल्लाप्पा एम. गुरव, जोतिबा केसरेकर, मोहन येळूकर, परशुराम माडीवाळकर, मारुती पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, महादेव घडी, सुभाष चलवादी, राजेंद्र कब्बुर, जोतिबा गुरव, इरफान ताळीकोटी, महादेव गुरव, संतोष पाटील, किरण मुळीमनी, शेतकरी गुंजाप्पा पाटील, श्री. बेळवटकर, श्री. सदामभाई आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *