..जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, मंत्री ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल…
मुंबई: लोकहित न्यूज
देशात मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. ते भाजपाचे 12 वें प्रदेशाध्यक्ष असतील. नुकतीच मुंबईत यानिमित्त मेळावा घेवून अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी माजी राष्ट्रीय भाजप अध्यक्ष तथा केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत बावनकुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासह सर्व मंत्री, आमदार व्यासपीठावर उपस्थित होते.
……पहिल्यांदाच कोंकणी अध्यक्ष ….
आतापर्यंत महाराष्ट्र राज्यांतील बहुतेक प्रदेशाध्यक्ष हे सर्व भागातील प्रदेशाध्यक्ष होवून गेले. पण, कोंकणाला हे पद मिळाले नव्हते. तेथील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार प्रथमच रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने प्रदेशाध्यक्ष पद मिळाले आहे. जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष ,मंत्री ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा चव्हाण यांचा प्रवास आहे.
प्रतिक्रिया –
रविंद्र चव्हाण हे पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. ते नक्कीच यापुढचा पक्षाचा पदभार प्रामाणिकपणे पार पडतील असा मला विश्वास आहे.
- ना. नितीन गडकरी, केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री.
Leave a Reply