माणीकवाडी विद्युत खांबावर पडलेले झाड वेळीच हटविल्याने अनर्थ टळला; प्रा. शंकर गावडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक…
खानापूर: लोकहित न्यूज
वेळ रात्री अकराची, गावातच घराशेजारी असलेल्या विद्युतभारीत खांबावर वाऱ्याने झाड कोसळते. याची माहिती मिळताच ग्रा. पंचायत सदस्य व प्रा. शंकर गावडा हे लगेच आपल्या सहकाऱ्यांना घेवून तत्काळ सदर झाड हटवून जीवितहानी होण्यापासून वाचवतात. समाजाप्रती वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून घेतलेल्या दक्षतेचे तालुक्यात कौतुक होत आहे. आजच्या वाढत्या स्वार्थी मानसीकतेपुढे अशी समाजकार्य हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच दिसून येतील. त्यामुळें मोठी घटना होण्यापासून वाचवणाऱ्या प्रा. गावडा यांचे जणू संकमोचकच म्हणून कौतुक होतांना दिसत आहे.
….काय आहे ही घटना….
खानापूरपासून जवळच असलेल्या माणिकवाडी गावात मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान झाड विद्युत प्रवाह सुरू असलेल्या खांबावर पडल्याने शॉर्ट सर्किट झाले. परिणामी प्रा. शंकर गावडा, महादेव गावडा, शावेर परेरा यांनी वेळीच धोका ओळखून तत्काळ सदर झाड तोडून बाजुला हटविल्याने सुदैवाने धोका टळला. तसेच या गावच्या लाईनमनलाही कळवून विद्युत से सेवा खंडित करण्यास सांगितले. त्यामुळें कोणतीही जीवितहानी होवू शकली नाही. तालुका आजूबाजूने जंगलाने व्यापल्याने विजेबाबत नेहमीच अशा घटना घडतात. त्यामुळें वेळीच हेस्कॉम् ने दक्षता घेण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया –
रात्री झोपताना एक झाड जवळच्या विद्युतभारीत खांबावर पडल्याचे समजले. वेळीच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लाईंमनला याची माहिती देवून विद्युत सेवा खंडित करायला लावली आणि नंतर सदर झाड हटविले.
- प्रा. शंकर गावडा, ग्राम पंचायत सदस्य माणिकवाडी.
Leave a Reply