–
.. माता अन् जगतजननी तू…
लोकहित न्यूज नेटवर्क – विलास कवठणकर
माता अन् जगतजननी तू… या वक्याने समाजातील प्रत्येकाच्या मनात आदर, अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. सांस्कृतिक आणि धार्मिक माहितीनुसार पूर्वी देवांचीही उत्पत्ती देवींच्या आशीर्वादाने झाली अशी आख्यायिका प्रचलित आहे. महिला हे समाजातील मोठे स्थान असून,त्यांच्या सहभागाशिवाय कोणतेच कार्य पुढे सरकत नाहीं. समाजात महिलांची अनेक रूपे पहायला मिळतात. कधी ती आई, कधी, बहीण, बायको, शिक्षिका, समाजसेविका, राजकर्त्या अशा वेगवेगळ्या भूमिकेत त्या दिसतात. परंतु, आज जरी वरील भूमिकांमध्ये महिला दिसत असल्या तरी त्यामागे त्यांचा खूप मोठा संघर्ष आणि त्यागाचा इतिहास लाभला आहे. सद्यस्थितीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असल्या तरी त्यांना आता तरी मुक्त आणि स्वातंत्र्य वाटते का? हा चिंतनाचा विषय आहे… तरीही पुरुषसत्ताक संस्कृतीचा काहींसा छाप आजही दिसतो आहे… आजच्या महिला दिनानिमित्त प्राचीन काळापासून स्त्री मुक्ती चळवळ, समाजाच्या हितासाठी आणि देशप्रेमाची योगदान दिलेल्या महिलांना लोकहित न्यूजतर्फे मानाचा मुजरा
….
समाजासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेल्या महिलांविषयी…
राजमाता जिजाऊ साहेब…
हिँदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी घडवले त्या स्वराज्यरक्षक राजमाता जिजाबाईसाहेब यांचे आपल्या देशावर फार उपकार आहेत. त्या काळी वतनदारीमुळे सामान्य नागरिकांवर होणारे अन्याय दूर केले. स्वराज्याचा हिरा छत्रपती महाराजांसारखा ‘हिरा ‘ तयार करण्यात जिजाऊ साहेबांचें मोठें परिश्रम लाभले आहेत. महाराज मोहिमेवर असताना राजकारभार जिजाऊसाहेबच पहायच्या, वेळ पडली तलवार घेऊन मैदानातही त्या उतल्याचा इतिहास आहे..
महाराणी सईबाई राणीसाहेब…
शिवरायांच्या लाडक्या पट्टराणी महाराणी सईबाई राणीसाहेब यांना कमी आयुष्य लाभले तरी तेवढ्याच काळातील त्यांचें कार्य महान आहे. महाराजांच्या महत्वाच्या सल्लागारापैकी त्या एक होत्या. स्वराज्याच्या कारभारात त्यांनी जिजाऊसाहेबांना हातभार लाभला आहे..
महाराणी येसूबाई राणीसाहेब…
शिवाजी महाराजांच्या मोठ्या सूनबाई व धर्मवीर शंभूराजांच्या
पत्नी अर्थात ‘श्रीसखी ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी येसूबाई राणीसाहेब यांनी स्वराज्यासाठी मोठा त्याग केला आहे. स्वराज्याच कुलमुखत्यार हे पद शंभूराजांनी महाराणींना दिले होते. शंभूराजांच्या हत्येनंतर युवराज राजाराम महाराजांना स्वराज्याच्या
गादीवर बसवून तब्बळ 29 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या आहेत. शंभूराजांच्या कारभारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे…
मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई राणीसाहेब…
छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर महाराणी ताराबाई राणीसाहेब स्वराज्याचा उत्तमरित्या कारभार पाहिला. त्यांच्या झुंजार व्यक्तिमत्वाच्या जोरावर
मोगलांशी दोन हात करून त्यांच्यावर चांगलंच वचक ठेवला होता. म्हणून त्यांची मोगलमर्दिनी अशी इतिहासात ओळख आहे…
दिपाताई बादल …
राणीसाहेब येसूबाई राणीसाहेबांच्या नात्याने आत्या असलेल्या दिपाताई बादल यांचेही स्वराज्यासाठी मोठे योगदान आहे. स्वराज्यात त्या न्यायदानाच काम पाहत होत्या. पावनखिंड युद्धात त्यांनी आपला मुलगा बाजी आणि बादल सैन्य गमावलं आहे.
‘भद्रकाली’ सरसेनापती उमाताई दाभाडे…
ज्यांच्या युद्धाची रणनीती अटी चालाखीची होती, म्हणून त्यांची ‘भद्रकाली ‘ अशी ओळख असणाऱ्या सरसेनापती उमाताई दाभाडे यांनी तलवार हातात घेऊन स्वराज्याचे रक्षण केले आहे….
झाशीची राणी…
1857 साली देश स्वतंत्र संग्रामात ब्रिटिशांशी अनेक वर्षे झुंज देत शहीद झालेल्या राणी झाशीची राणी यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांची यशोगाथा आजही प्रेरणा देत आहे…
ब्रिटिशांशी कडवी झुंज देणाऱ्या पहिल्या महिला राणी कित्तुर चन्नम्मा…
मूळच्या बेळगांव काकती येथील राणी चन्नम्मा या बेळगांव जिल्ह्यातील कित्तुर संस्थांनच्या राणी होत्या. त्यांचा जन्म काकती येथे 14 नोव्हेंबर 1777 साली लिंगायत कुटुंबात झाला. लहापणापासूनच कुटुंबाच्या परंपरेनुसार धनुर्विद्या, तलवारविद्या घोडेस्वाराचे प्रशिक्षण मिळाले आहे. वयाच्या 15 वर्षी देसाई कुटुंबातील राजा मल्लसर्जा यांच्याशी विवाह झाला. 1824 च्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बंड पुकारून ब्रिटिशांना हरवले आहे…
क्रांतिज्योती सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका…
क्रांतिज्योती सावित्रीबाई या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली नायगाव येथे झाला. त्या काळात त्याकाळच्या पुरुषसत्ताक संस्कृतीत स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जायची. शिवाय त्यांना शिकण्याची मुबा नव्हती. त्याविरोधात पहिले पाऊल टाकले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक त्रास सहन करत, त्या गल्लीतून त्यांच्यावर जातांना विरोधी लोकांकडून शेन मारण्यासह विविध प्रकारे त्रास दिला जायचा. अशा सर्व समस्यांचा सामना करत त्यांनी महिलांना शिक्षण दिले आहे. म्हणून त्यांना पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून भारतातील महिलांना हक्क मिळण्यासाठी मुत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी लिंगावर आधारीत जात, भेदभाव व अन्यायकारक वागणूक नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, म्हणून त्यांना भारतातील स्रीवादी चळवळीचे प्रणेते म्हणून मानले जाते. त्यांनी 1848 साली तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी भिडेवाडा येथे महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे महिला शिक्षणाचे प्रणेते होते. ..
पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी…
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांची ओळख आहे. प्रभावी निर्णयक्षम, अभ्यासूवृत्तीने त्यांनी देशाचा कारभार पाहिला आहे. ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा आणून लाखों भारतीयांना जमीन मालक बनविले. शिवाय त्याकाळी सावकारशाहीच्या जाळ्यात अडकलेल्या गोरंगरीबांना मुक्त केले आहे.
प्रभावी विदेश मंत्री सुष्णा स्वराज….
भाजप सरकारच्या काळातील प्रभावी विदेश मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांच्याकडे पाहिले जाते. त्या उत्तम वक्त्याही होत्या. त्यांच्याकाळात देशाच्या हिताचे निर्णय झाले आहेत.
पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी..
देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी बनून महिलांची कायद्याततही मान उंचावली त्या किरण बेदी यांची ड्यासिंग जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून देशभरात छाप सोडली आहे.
हजारों अनाथ मुलांच्या माता सिंधुताई सपकाळ…
हजारों अनाथ , बेवारस लहान लहान मुलांच्या माता म्हणून सिंधुताई सपकाळ यांची ओळख आहे.
अशा मुलांना सर्व शिक्षण , त्यांना कपडे, भोजनासह स्वावलंबी बनवण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. सदर युवक युवती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्यानंतर त्यांच्या विवाहासाठी जोडीदार शोधून कार्यही उरकले जाते. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी 1994 साली सिंधुताई सपकाळ यांनी बाल सदन नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत 1052 हून अधिक मुले आहेत.
सिंधुताई सपकाळ यांना 2012 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तर 2021 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 ला झाला तर 4 जानेवारी 2022 साली पुणे येथे मृत्यू झाला. अशा या सर्व समाजसेविकांच्या कार्याला सलाम…
Leave a Reply