मलप्रभेला पाणी वाढल्याने तिसऱ्यांदा उभारलेले कुसमळीचे पर्यायी पुल गेले वाहून.. आता नवीन पुलाशिवाय पर्यायच नाही…


    नवीन पुलाच्या दोन्हीं बाजूच्या  कामासाठी आणखी एक महिन्याचा आवश्यक.. आमदार साहेब जरा पाहणी करा ना…

जांबोटी: लोकहित न्यूज

    शनिवारी  पावसाने जोर केल्याने मलप्रभेला पाणी आल्याने अखेर कुसमळी पुलाच्या बाजूचे पर्यायी पुल वाहून गेले आहे. परिणामी नदीला पाणी वाढल्याने पुन्हा सदर पर्यायी पुल उभारणे कठीण असून, दुसरीकडे नवीन पुलाच्या दरवाजांचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्हीं बाजूच्या कामासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी आवश्यक आहे असे, कंत्राटदारांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी बेळगांव – जांबोटी चोर्ला मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली असून, ती खानापूर व्हाया जांबोटी तर काहीं वाहतूक बेळगांव बैलुर व्हाया देवाचीहट्टी जांबोटी या दोन्हीं एकेरी रस्त्यांनी वळविल्याने दोन्हीं रस्त्यांच्या दुर्दशेत मोठी भर पडली आहे. त्यामुळें लवकरात लवकर कुसमळीच्या नवीन पुळाचे काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

       पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळें मलप्रभा नदीला पाणी वाढले , शनिवारी रात्रीपर्यंत पर्यायी पुलावर पाणी नव्हते. सकाळच्या सुमारास पाणी वाढल्याने सदर पुल वाहून गेले आहे. या येथील नवीन पुलाच्या कामाला विलंब झाल्याने जांबोटी भागासह गोवा आणि बेळगांवला ये – जा करणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

….आमदारसाहेब आपण कुठे? आहात…जरा खानापूर – बैलूर रस्त्यांची पाहणी करा की…

   कुसमळी पुलाच्या कामाच्या विलंबामुळे बेळगांव – गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, ती खानापूर व्हाया जांबोटी तर बेळगांव बैलुर व्हाया देवाचीहट्टी रस्त्यांनी वळविण्यात आली आहे. परिणामी चोर्ला मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे दोन्हीं रस्त्यांची दुर्दशा झाली.  दोन्हीं रस्त्यांने होणाऱ्या स्थानीक वाहतुकीला भविष्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. याला जबाबदार कोण? आमदार विठ्ठल हलगेकर साहेब आपण कुठे? आहात… जरा दोन्हीं रस्त्यांची पाहणी करा की, अशी हाक नागरिकांतून ऐकू येत आहे.

बैलूर रस्त्याचे टेंडर ‘तुझ्या आणि माझ्या कॉन्ट्रॅक्टर’ या हट्टामध्ये अडकले की काय?

       बैलुर रस्त्यासाठी कोटींचा निधी मंजूर झाला असून, आमदार साहेबांच्याहस्ते दोन महिन्यापूर्वी दिमाखात पूजा करण्यात आली. मात्र, अद्याप तरी कोणत्याच हकचाली दिसत नाहीत. त्यामुळें या रस्त्याबाबत नागरिकात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हे काम ‘तुझा कॉन्ट्रॅक्टर की माझा कॉन्ट्रॅक्टर’ या हट्टामुळे अडकल्याचे ऐकू येत आहे.. आमदार साहेबांनी याचा जरा पाठपुरावा करण्याची गरज आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *