जांबोटी: लोकहित न्यूज
जिल्ह्याचा चर्चेचा विषय राहिलेल्या चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात येत असलेल्या कुसमळी पुलाची महसूलमंत्री कृष्ण भैरेगावडा यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी पुलाचे काम उत्कृष्ट करा अशी सूचना महसूलमंत्र्यांनी कर्नाटक रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी महमद रोशन, जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, तहसीलदार शिवाप्पा कोमार , तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी, विनायक मुतगेकर, सुरेश जाधव, दिपक कवठनकर, महादेव कोळी, प्रसाद पाटील, विलास बेळगांवकर , भैरू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते..
Leave a Reply