वाडेकर कुटुंबीयांतील 29 जणांच्या नावावर असलेल्या आठ एक्करपैकी चार एक्कर एकट्यानेच हडप करून विकण्याचा प्रयत्न, न्यायालयाने हाणून पाडला..
कणकुंबी: लोकहित न्यूज…
खानापूर तालुका गोंधळातून कधी होणार मुक्त? तहसीलदार, सर्वे कार्यालयातील तिघे लोकायुक्त पोलिसांच्या कारवाईनंतर बडतर्फ झाले. पण तरीही एजंटराज मात्र, कमी होताना दिसेना! अशीच एक घटना कणकुंबी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कणकुंबी ( तालुका खानापूर) गावात घडली आहे. येथील वाडेकर कुटुंबीयांचे पूर्वापार गावापासून काहीं अंतरावर पारवाड रस्त्याला लागून लखम शेतवाडा म्हणून ओळख असलेल्या ठिकाणी वाडेकर कुटुंबीयांच्या 29 जणांच्या हक्काची 8 एक्कर गावठाण जमीन आहे. त्यातील एक असलेल्या दीपक वाडेकर यांनी 4 एक्कर गावठाण जमीन ग्राम पंचायत पीडीओंना धरून स्वतःच्या नावावर कंप्युटर उतारा काढून परस्पर विकण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. त्यामुळें पुन्हा एकदा एजंटांचे किती मोठें जाळे अजूनही पसरले आहे हे यावरून स्पष्ट होते.
…..नेमकं काय आहे हे प्रकरण; काय म्हणते कोर्ट ….
.. कणकुंबी हे गाव जांबोटी – चोर्ला मार्गावरच आहे. यामुळें जिल्ह्यासाठी हे गाव पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. पण, याच जंगल भागांत एजंटांचे जाळेही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याच ठिकाणी वाडेकर कुटुंबीयांची पूर्वापार हक्काची 8 एक्कर गावठाण जमीन आहे. त्यावर 29 जणांचा हक्क असून, पूर्वी ठिकाणीं या नागरिकांची घरे अर्थात वाडा होता असे, तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यातील एक असलेल्या दिपक वाडेकर यांनी 4 एक्कर जमीन परस्पर आपल्या नावावर चढवून पंचायत कंप्युटर उतारा पीडीओंना हाताशी धरून काढून घेतला. आणि त्याठिकाणी रिसॉर्टची योजना आखून, त्यांनी त्यानुसार कामाला सुरवात झाली. त्यानंतर इतर हक्कदारांच्या लक्षात आले. नेमके काय सुरू आहे आपल्या जमिनीमध्ये असा प्रश्न त्यांना पडला. लागलीच चंद्रकांत वाडेकर यांच्यासह वाडेकर कुटुंबीयांनी ग्राम पंचायतीत धाव घेवून विचारपूस केली असता वरील नमूद केलेला सर्व प्रकार निदर्शनास येताच त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यावर न्यायालयाने तक्रारदारांची बाजू ऐकून घेवून ग्राम पंचायतीला तत्काळ आदेश काढला, की यासंदर्भातील कोणत्याही कागदपत्रात यापुढे आदला -बदल करु नये, असे सांगत पुढच्या कामाला न्यायालयाने ‘ब्रेक’ लावला आहे. त्यामुळें पुन्हा एकदा ग्रामीण भागातही एजंट जाळे मोठया प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे.
…या प्रकरणात खानापुरातील धनाड्यांचा समावेश असल्याची माहिती…
या प्रकरणात दिपक वाडेकर यांच्यासह खानापूरात आम्हीं जनतेचे आवाज म्हणवणाऱ्या काहीं धनाढ्य लोकांनी या जमिनीत पैसे लावल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळें या हे प्रकरण कोणत्या वळणावर जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण, माहिती असणाऱ्यानी सामान्य नागरीकांच्या हक्काचा कसा विचार केला नसेल? असाच प्रश्न उपस्थित होते आहे.
……पीडीओंवर खानापूरतून दबाव कुणाचा?
खानापूर तालुक्यात गैरधंदे आणि व्यवहारांना पाठीशी घालण्यात तालुक्यातील नेत्यांचा हातखंडा राहिला आहे. त्यामुळेच तालुक्याची अशी परिस्थिती होवून बसली आहे. न्यायालयात हे प्रकरणं सूरू असतानाच खानापूरातून पीडीओंवर लोकप्रतिनिधी लेवल दबाव येत होता. कोण बर व्यक्त असेल ती अशा गैर कारभाराला आशीर्वाद देणारी? याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे. याचा ‘लोकहित न्यूज’ तर्फे शोध सुरू आहे..
……काय म्हणाले पीडीओ …
कणकुंबी ग्राम पंचायतीचे पीडीओ सुनिल अंबारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, या जमिनीचा कॉम्पुटर उतारा काढून दिला आहे. पण, न्यायलयाने पुढील कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळें यापुढे या जमिनीच्या कागदपत्रात कोणताही बदल होणार नाही, असे सांगतानाच, खानापुरातून दबाव येत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
Leave a Reply