शिवस्मारक ते संत ज्ञानेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे आ. विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते उद्धघाटन..


32 लाख 80 हजारचा निधी उपलब्ध; लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची आमदारांची कंत्रादारांना सूचना..

खानापूर: लोकहित न्यूज

     खानापूर शिवस्मारक ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार विठ्ठल हकगेकर यांच्या प्रयत्नातून 32 लाख 80 हजाराचा निधी मंजूर झाला असून, नुकतेच त्याचे आमदारांच्याहस्ते उद्धघाटन करण्यात आले. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची सूचना आ. हकगेकर यांनी कंत्रादारांना यावेळी दिली. खानापूर शहरातील महत्वाचा हा रस्ता असून, त्याचा विकास होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नगरपंचायतीच्या अध्यक्षा मीनाक्षी बैलूरकर, उपाध्यक्षा जया भुत्की, नगरसेवक आपय्या कोडोळी, मेघा कुंदरगी, लक्ष्मण मादार , मझहर खानापुरी, रफिक वारीमणी, राजश्री तोपिनकट्टी, नारायण ओकले, हणमंत पुजारी, प्रकाश बैलूरकर, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानीकोप्प, माजी अध्यक्ष संजय कुबल, लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, तालुका भाजपा सचिव मल्लाप्पा मारीहाळ, गुंडू तोपिनकट्टी,राजेंद्र रायका, चेतन मनेरीकर, वसंत देसाई, राहुल अळवणी, राजू करंबळकर, सदानंद मासेकर, पुंडलिक अंधारे, भूषण ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुर्बेट यांनी आमदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *