खानापूर : लोकहित न्यूज
गेल्या सहा महिन्यांत तालुका स्तरीय मुख्य अधिकाऱ्यांना निलंबनाचा दणका बसल्यानंतरही बोकाळलेला त्यांचा मीपणा आणि भ्रष्टाचारीवृती कमी होण्याचे नाव घेईना. त्यामुळे लवकरच आणखी दोघा अधिकाऱ्यांची बारी आल्याची माहिती मिळत आहे. तालुक्याच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक नसल्याने तालुका काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे सरकारला यात हस्तक्षेप करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट घरीच पाठवण्याचे सत्र आणखी काही दिवस सुरूच राहण्याचे चिन्हं दिसत आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि भाजप आमदार सी. टी. रवी यांच्या प्रकरणात खानापूरचे तत्कालीन सीपीआय मंजुनाथ नायक, बेहिशेबी मालमत्ता सापडल्याच्या आरोपावरून तहसीलदार प्रकाश गायकवाड, तहसिल कार्यालयात सर्वे विभागातील 2 अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी त्यांचें निलंबन झाले, तर तालुका पंचायत ईओवरही अशीच पाळी आली. ….आता आरोग्य आणि पीडब्लूडीचा क्रमांक लागणार का? दोन दिवसांपूर्वी गस्टोळी येथील बाळंतीण महिलेकडून पैशे उकळण्याचा प्रयत्न तालुका सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी केल्याचा आरोप आहे. ती तक्रार मा. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्यापर्यंत जाताच त्यांनी टीएचओंची चांगलीच खरडपट्टी काढली. तरीही अद्याप येथील गोंधळाची चर्चा सुरूच आहे. तर पीडब्लूडीमध्येही तेच ऐकायला मिळत आहे. काम काहीच नाही नुसताच दिखावा असे येथील प्रकार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लवकरच या दोन्हीं खात्यांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे..प्रतिक्रीया… तालुक्यातील अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिला नसल्याने सामान्य जनतेची छळवणूक, लूट सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार आमच्याकडे येत आहेत. त्यांची आम्हीं वेळोवेळी दखल घेवून सबंधित अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. यापुढेही असेच प्रकार सुरुच राहिल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. याची आधिकाऱ्यानी नोंद घ्यावी. आणखी दोन खात्यातील अधिकारी चर्चेतील आहेत, त्यांचाही पाठपुरावा होईल.. – महादेव कोळी, तालुका काँग्रेस नेते..
Leave a Reply