अवघ्या काहीं मिनिटातच झालेल्या कुस्तीने प्रेक्षकांचे पारणे फेडले..
खानापूर:: लोकहित क्रीडा न्यूज
खानापूर तालुका कुस्ती संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या अंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान खूपच गाजले. या स्पर्धेतील नंबर एकची कुस्ती यंदाचा महाराष्ट्र केसरी गदा उचललेल्या पृथ्वीराज मोहोळ आणि सोनुकुमार हरियाणा यांच्यात लावण्यात आली होती. अंदाजे पंधरा मिनिटे रंगतदार स्थितीत चाललेल्या या कुस्तीत दोन्हीं मल्लांनी चांगलीच चमक दाखवली. मात्र, अखेर डावात प्रावीण्य असलेल्या पृथ्वीराज मोहोळने लपेट डावावर सोनूकुमारला चितपट करत खणापुरचे मैदान मारले. ही कुस्ती आ. विठ्ठल हलगेकर व जेडीएसचे जेष्ठ नेते नासीर बागवान यांच्याहस्ते लावण्यात आली होती. तर त्या कुस्तीसाठी पंच म्हणून तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हणमंत पाटील व सदस्य लक्ष्मण बामणे होते . त्यांच्यासोबत संघटनेचे सदस्य प्रकाश मजगावी यांनीही मैदानात उपस्थित होते. यावेळी माजी आ. डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील, लक्ष्मण झांजरे, मलापा मारीहाळ यांच्यासह अमंत्रित पाहुणे उपस्थित होते.

( सूचना – उर्वरित कुस्त्यांचा निकाल उद्या प्रसिद्ध होईल) ..
Leave a Reply