कौलापूरवाडावाशियांचे कॉलिटी (हॅचरी) विरोधात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जि. पं.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन..
बेळगांव: लोकहित न्यूज
चुकीचे सर्वेक्षण अर्थात आजुबाजूच्या गावांची भौगोलिक चुकीची (चेकबंदी) माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारला दिल्यामुळे क्वालिटी कंपनीच्या हॅचरी प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे, या प्रकल्पापासून अवघ्या दिडशे मिटरवर गावची हद्द सूरू होते तर पाचशे मीटरच्या आत कौलापुरवाडा हे गाव आहे. असे असताना कौलापुरवाडा हे गाव दोन किलो मिटर अंतरावर, तीर्थकुंडये 3 किलो मीटर, उचवडे 7 किमी अंतर तर मार्कंडेयनगर 6 किमी अंतरावर असल्याचे जिल्हा आरोग्य आधिकाऱ्यांच्या अहवालात दाखवण्यात आलेले सर्व चुकीचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानीक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारला दिलेल्या अहवालाची चौकशी करावी. याच चुकीच्या अहवालानुसार सरकारने क्वालिटीच्या सदर प्रकल्पाला परवानगी दिल्याने नागरीकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा सरकारने पुनर्विचार करून सदर परवानगी तत्काळ रद्द करावी अशी मागणी केली असून, या प्रकल्पाला आमचा विरोधही कायम राहील असे जिल्हाधिकारी, प्राधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सरकारला चुकीचा अहवाल देणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी जोरदार मागणी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.
श्री लोपेश्वर देवस्थान कमिटी व गावकऱ्यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात , आमच्या गावाजवळ क्वालिटीच्या पोल्ट्री फार्म उभारल्यापासून आम्हीं विरोध करत आलो आहोत. तरीही अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे वेळोवेळी आमचा विरोध दाबण्यात येत आहे. आता पुन्हा त्याहून मोठा हॅथरी नावाचा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे, त्यामुळें गावच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण, त्यातून निघणाऱ्या विषारी माष्यांमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा डीसी, सीईओनी विचार करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी करत गावापेक्षा वैयक्तिक प्रकल्प महत्वाचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी युवा नेते भैरु पाटील, देवस्थान कमिटी अध्यक्ष गंगाराम बावदाने व यांच्यासह आदी गावकरी उपस्थित होते. सदर निवेदन स्वीकारून झेडपी सीईओनी पाठपुरावा करण्याची हमी नागरिकांना दिली .
Leave a Reply