विविध धार्मिक कार्यक्रम, नाटक ,महाप्रसादाचे आयोजन…
जांबोटी: लोकहित न्यूज
राम जन्मला ला गं सखे! राम जन्मला! पुरुषोत्तम श्री राम! जय जय राम! हिंदूचे आराध्य दैवत श्री राम यांच्या रामनवमीचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे. खानापूर तालुक्यात अनेक गावांत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे. आज जांबोटी पश्र्चिम भागात जांबोटी आमटे, गोल्याळी, हब्बनहट्टीसह भागांत मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा होत आहे.
जांबोटीत सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील, सकाळीं 10 ते 12 गोव्यातील ह.भ.प गणेशबुवा नाईक यांचे सुश्राव्य किर्तन होईल, त्यानंतर 12 वाजता श्री राम जन्मोत्सव होणार आहे, या निमित्त भागातील हजारों भाविक उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी 4 ते 9 यावेळेत श्रींच्या पालखीची गावात मिरवणूक काढण्यात येईल. तरी भागातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जांबोटी उत्सव कमिटी, पंच मंडळी पेठ रामापुर -जांबोटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply